‘मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घरी आलो तुम्हीपण लगेच क्वारंटाईन व्हा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:48 IST2020-06-05T12:48:39+5:302020-06-05T12:48:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना स्वॅब देऊनही सारंगखेड्यात येऊन गेलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यामुळे ...

‘I came home because I was a corona positive. | ‘मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घरी आलो तुम्हीपण लगेच क्वारंटाईन व्हा’

‘मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने घरी आलो तुम्हीपण लगेच क्वारंटाईन व्हा’

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : पत्नी आणि मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असताना स्वॅब देऊनही सारंगखेड्यात येऊन गेलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्यामुळे गाव वेठीस धरले गेले आहे़ स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्यानंतर घरी परतलेल्या डॉक्टरने ‘मी कोरोना पाझिटिव्ह असल्याने घरी आलोय’ असा निरोप देत कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला देऊन संपूर्ण तालुक्याची झोप उडवली आहे़
मालेगाव येथील आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले असून संबधित डॉक्टरच्या बेजबाबदार वागणूकीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सारंगखेड्यातून होत आहे़ सारंगखेडा येथे पशुधन विकास अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉक्टर मालेगावचे रहिवासी असून मालेगाव ते सारंगखेडा असा दुचाकीने आठवड्यातून कधीतरी प्रवास करुन सेवा देण्याचा आव आणतात़ दरम्यान गेल्या आठवड्यात त्यांची मुलगी आणि पत्नी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर आली होती़ संबधित पशुधन विकास अधिकारी यांचाही मालेगावी स्वॅब घेतला गेला होता़ असे असतानाही ते २९ रोजी सकाळीच सारंगखेडा येथे दुचाकीने हजर झाले होते़ दिवसभर येथील लोकांच्या संपर्कात राहून रात्री शहादा येथे मुक्कामी गेलेल्या डॉक्टरला त्यांच्या कुटूंबाने ‘तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात परत या’ अशी माहिती दिल्यानंतर सकाळी दुचाकीने मालेगावकडे रवाना झाले होते़ घरी पोहोचल्यानंतर संपर्कात आलेल्या येथील पशुवैद्यकीय कर्मचाºयांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला देत त्यांनी फुशारक्याही मारल्या होत्या़ त्यांच्या या मेसेजमुळे कर्मचारी हादरुन कुटंूब सोडून क्वारंटाईन कक्षात रवाना झाले़ या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर सारंंगखेडा गावातील सुरु झालेले व्यवसाय पुन्हा बंद पडून जनजीवनही विस्कळीत झाले आहे़ बाहेरगावाहून येणाºयांना माहिती देणे अनिवार्य असताना संबधित डॉक्टर सुटलेच कसे असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे़
विशेष बाब म्हणजे शहादा येथे सारंगखेडा पशुवैद्यकीय दवाखान्याचे कर्मचारी हे क्वारंटाईन झाल्यावर तीन दिवस उलटूनही तालुका आरोग्य विभागाने सारंगखेडा ग्रामपंचायत किंवा पोलीस ठाण्यात माहिती दिली नाही़ एवढा भयावह प्रकार घडूनही जिल्हा किंवा तालुका आरोग्य विभागाचे एकही अधिकारी किंवा कर्मचारी गावात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे़ संबधित डॉक्टरने सारंगखेडा आणि परिसरातील पशुपालकांच्या गुरांचे २९ रोजी लसीकरण केले होते़ यातून गंभीर प्रकार घडण्याची भिती असल्याने चौकशी करण्याची मागणी आहे़

Web Title: ‘I came home because I was a corona positive.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.