काही दिवसांपूर्वी परत आले ्रपुन्हा लॉकडाऊन होताच गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:56 IST2020-08-03T12:56:20+5:302020-08-03T12:56:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच ...

काही दिवसांपूर्वी परत आले ्रपुन्हा लॉकडाऊन होताच गेले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच आपआपल्या गावी निघून गेले होते़ यातील काही जून महिन्यात परतले होते़ परंतु पुन्हा लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पाहून अनेकजण पुन्हा घरी रवाना झाले आहेत़
जिल्ह्यात खाद्यपदार्थ आणि बांधकाम व्यवसायात राजस्थानी, मेहनत आणि मजूरीच्या कामासाठी उत्तर प्रदेश तर रेल्वेच्या किरकोळ कामांत बिहारी मजूर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत़ यात मध्यप्रदेशातून येणारे मजूरही शहरात काम मिळवू लागले आहेत़ रेल्वेने येथे येणे सोयीस्कर असल्याने अनेकांनी याठिकाणी बस्तान मांडले आहे़ यातील काही हे येथीलच रहिवासी झाले आहेत़ तर काहींचा परिवार आजही गावीच आहे़ यातून वर्षातून दोन महिने गावी जावून हे मजूर व व्यावसायिक कुटंूबासोबत घालवतात़ मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी यातील बºयाच जणांनी स्वत:ची सोय करुन घेत गावाचा रस्ता धरला होता़ स्थानिक ठेकेदाराकडे हिशोब करुन ते रवाना झाले आहेत़ दोन महिने घरी राहिल्यानंतर जूनच्या मध्यात यातील काही परत आले होते़ परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि दीड महिन्यात दोन वेळा झालेले किरकोळ लॉकडाऊन यामुळे त्यांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले आहे़ परिणामी घराचे बांधकाम पूर्ण होऊनही अनेकांचे छताचे पीओपी, फ्लोरींग, कोटा फरशीची कटाई आणि बसवणे यासह किरकोळ बांधकाम व दुरूस्त्या बंद पडल्या आहेत़ दुसरीकडे नंदुरबारसह इतर शहरी भागात राजस्थानी चवीचे ‘इन्सस्टंट’ खाद्य पदार्थ आणि मिठाई तयार करणारे राजस्थानी कारागिरही परत गेले असल्याने या दुकानांनाही घरघर लागली आहे़ अनेकांची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने सुरू झाली असली तरी त्यात ‘ती’ चव नसल्याने व्यवसाय बंद पडले आहेत़
सोबत शहरातील विविध भागात पाणीपुरी, शेंगदाणे-फुटाणे यासह इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारेही दिसून येत नाहीत़ बहुतांश उत्तर भारतीय मजूर हे गावी गेल्याने मेहनतीचे काम असलेली बांधकाम, रेल्वेची खडी रचण्याची कामे, सिमेंट व्लॉक तयार करण्याची कामेही बंद पडली आहेत़
४नंदुरबार शहरात सुमारे दीड हजार राजस्थानी कारागीर आहेत़ यातील बहुतांश हे बांधकाम क्षेत्राशी तर ५०० च्या जवळपास कारागीर हे हॉटेल व्यवसायात आहेत़
४बांधकाम क्षेत्रातील कारागिर घरी गेले असल्याने अनेकांच्या घरांची काम पूर्ण होवू शकलेली नाहीत़ हे कारागिर रक्षाबंधननंतर परत येतील असा अंदाज आहे़
४उत्तर प्रदेशातील बहुतांश कामगार हे बांधकामावर मजूरीसह चौकीदारी, रस्ते काम तसेच इतर मजूरीच्या कामात सक्रीय होते़ हे सर्वच परत गेले आहेत़ मजूरांना येण्यासाठी साधने मिळत नसल्याने त्यांचा म्हणून तेवढा राबता अद्याप नाही़ किमान एक हजारच्या जवळपास कामगार कुटूंबांसह परत येतील़ सोबत बिहारी मजूरही परत येणार आहेत़
४हॉटेल्समध्ये सफाई, वेटर तसेच पदार्थ तयार करणाºया राजस्थानी आणि उत्तरप्रदेशातील कामगारांना मोठी मागणी असते़ शहरातील परप्रांतीयांची ७० टक्के खाद्यपदार्थ दुकाने आणि हॉटेल्स यात मनुष्यबळ नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे़ यातून त्यावर आधारित व्यवसायांचिही घडी विस्कटली आहे़