Hygienic Awareness through LED Illustrations | एलईडी चित्ररथाद्वारे स्वच्छतेविषक जनजागृती
एलईडी चित्ररथाद्वारे स्वच्छतेविषक जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विविध योजनांचे संदेश एलईडी चित्ररथाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन रथ उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षा सीमा वळवी व उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात शाश्वत स्वच्छता राहावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. त्याच अनुषगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यासाठी दोन एलईडी रथ पुरविण्यात आले आहेत. त्यांचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी.टी.बडगुजर आदींसह सर्व विभागप्रमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी उपस्थित होते.
शासनातर्फे देण्यात आलेल्या दोन्ही रथ हे जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायती मध्ये जाऊन पाणी व स्वच्छता या विषयी असलेल्या विविध व्हिडियो फिल्म ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी यांना दाखविण्यात येतील. ग्रामीण भागात स्वच्छतेविषयक जाणीवजागृती करण्यात येणार आहे. यामुळे ज्या ग्रामपंचायत मध्ये येईल त्या ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक तसेच शिक्षकांनी संबंधीताना सहकार्य करावे असे आवाहान पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Hygienic Awareness through LED Illustrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.