वर्दळ झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:21+5:302021-06-09T04:38:21+5:30
नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील गर्दी कमी झाली आहे. नेत्र कक्ष आणि महिला रुग्णालयाबाहेर होणारी ...

वर्दळ झाली कमी
नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील गर्दी कमी झाली आहे. नेत्र कक्ष आणि महिला रुग्णालयाबाहेर होणारी नातेवाइकांची गर्दीही कमी झाली असल्याचे दिसून आले आहे. तीन महिन्यानंतर या भागात शुकशुकाट दिसून येत आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या ड्यूटीच्या वेळेत बदल झाले आहेत.
अवैध व्यवसाय सुरू
नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैक ते संतसेना चाैक या मार्गावर अवैध मद्यविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याठिकाणी मद्यपी तसेच टारगटांची भांडणेही होत आहेत. लगतच्या स्वामी समर्थ नगर व जयचंद नागरिकांनी याबाबत सातत्याने तक्रारी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही.
पोलिसांकडून कारवाई
नंदुरबार : जिल्ह्यात पोलीस ठाण्यांतर्गत मास्कचा वापर न करता भटकंती करणाऱ्या ११ जणांवर पोलीस पथकांनी कारवाई केली. अनलाॅक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वाचा पालन करणाऱ्या बेशिस्तांवर ही कारवाई केली गेली. शहादा, मोलगी, सारंगखेडा, धडगाव, तळोदा, म्हसावद, नंदुरबार शहर, नवापूर, उपनगर, विसरवाडी व अक्कलकुवा पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.