कारच्या धडकेत पती-पत्नीसह मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 12:51 IST2020-12-27T12:51:18+5:302020-12-27T12:51:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी व मुलगा जखमी झाल्याची घटना नंदुरबार-साक्री रस्त्यावर घडली. ...

कारच्या धडकेत पती-पत्नीसह मुलगा जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी व मुलगा जखमी झाल्याची घटना नंदुरबार-साक्री रस्त्यावर घडली. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कन्हैया गुलाब भोये, कौशल्या भोये, आयुष भोये असे जखमींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, भोये परिवार आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच १८ आर ५६२५) जात असतांना त्यांना ठाणेपाडा ते आष्टे दरम्यान भरधाव वाहनाने धडक दिली. त्यामुळे ते फेकले जाऊन जखमी झाले. अपघातानंतर कार तेथून पसार झाली. तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत कन्हैय्या गुलाब मोरे यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात कार चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मुकेश ठाकरे करीत आहे.