पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:30 IST2021-04-17T04:30:18+5:302021-04-17T04:30:18+5:30

शहादा येथील ॲग्रो ट्रॅक्टरचे मालक गोविंद सुपडू चौधरी यांच्या पत्नी रेखाबाई गोविंद चौधरी यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना शहरातील ...

Husband also dies after wife's death | पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू

पत्नीच्या निधनानंतर पतीचाही मृत्यू

शहादा येथील ॲग्रो ट्रॅक्टरचे मालक गोविंद सुपडू चौधरी यांच्या पत्नी रेखाबाई गोविंद चौधरी यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती जास्त खालावल्याने पुढील उपचारासाठी १२ एप्रिल रोजी नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना १४ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. गोविंद चौधरी यांचीही प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांचे मित्र माजी नगराध्यक्ष अशोक बागूल यांनी दोंडाईचा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ते आजारी असल्याने त्यांना पत्नीच्या निधनाची माहितीही देण्यात आली नव्हती. दोन दिवसांपूर्वी रेखाबाईंचे निधन झाल्याने रिकाम्या झालेल्या बेडवरच गोविंद चौधरी यांना नाशिक येथे दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने पत्नी पाठोपाठ गोविंद चौधरी यांनीही त्याच बेडवर अखेरचा श्वास घेतला. ते प्रकाशा येथील रमेश चौधरी यांचे भाऊ होत.

Web Title: Husband also dies after wife's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.