महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण
By Admin | Updated: May 20, 2017 18:16 IST2017-05-20T18:16:41+5:302017-05-20T18:16:41+5:30
25 वर्षीय विवाहितेच्या पतीला फोन करून शिवीगाळ केली होती़

महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 20 - शहादा शहरातील प्रेस मारूती कमान परिसरात 25 वर्षीय विवाहितेबाबत अपशब्द वापरत तिच्या पतीला मारहाण करण्यात आली.
इमरान उमर मेमन याने मौजीनगर गरीब नवाज कॉलनी शहादा येथील 25 वर्षीय विवाहितेच्या पतीला फोन करून शिवीगाळ केली होती़ या प्रकारानंतर पीडित विवाहिता ही पतीसोबत प्रेस मारूती परिसरातून जात असताना इमरान उमर मेमन, अरशद इकबाल मेमन, बाबू उर्फ सरफराज इकबाल मेमन, सोनी उर्फ वंदना बारी सर्व रा़ नंदुरबार, अमोल रामचंद्र ठोंबरे रा़ प्रकाशा यांनी दोघांनाही थांबवून मारहाण करण्यास सुरूवात केली़ यातील इमरान मेमन व सरफराज मेमन यांनी लाकडी दांडका व लोखंडी पाईप याच्या सहाय्याने पिडीत महिलेच्या पतीस बेदम मारहाण केली़ तसेच इमरान याने पीडितेचे कपडे फाडून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
याबाबत पीडित महिलेने शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इमरान, अरशद व सरफराज मेमन, वंदना बारी आणि अमोल ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े यात संशयित महिला आरोपी व सरफराज मेमन हे दोघेही फरार असून तिघांना तात्काळ अटक करण्यात आली आह़े