ग्रामीण भागात हुरडा पार्ट्या सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:56+5:302021-02-06T04:58:56+5:30
सोनार गल्लीत वारवांर वाहतुकीचा खोळंबा नंदुरबार: शहरातील सोनार गल्ली,जळका बाजार,डॅा.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या भागातील रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला ...

ग्रामीण भागात हुरडा पार्ट्या सुरू
सोनार गल्लीत वारवांर वाहतुकीचा खोळंबा
नंदुरबार: शहरातील सोनार गल्ली,जळका बाजार,डॅा.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या भागातील रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहेत. या भागातील रस्ते अरुंद असल्याने तीन चाकी व चारचाकी वाहनामुळे वाहनाचा खोळंबा वारंवार निर्माण होत असून त्यामुळे या रस्त्याने अत्यावश्यक रुग्णवाहिका नेतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
थंडीमुळे गहूचे पोषण वाढले
नंदुरबार: शहादा तालक्यातील मोहिदा परिसरात थंडीचे प्रमाण वाढले असल्याने गहू पिकाला पोषक वातावरण मिळत आहे.गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. ही थंडी रब्बी पिकांसाठी विशेषता गहू,हरभरा,ज्वारी या पिकांना फायदेशीर ठरणार आहे. थंडीमुळे या पिकांची वाढ जोमदार होणार असून त्यामुळे उत्पादन वाढणार आहे.