जनता कर्फ्यूतही वाहतूक सेवा मात्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:42 IST2020-09-07T11:42:33+5:302020-09-07T11:42:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रविवारी नंदुरबारसह चार शहरात जनता कर्फ्यू असतांनाही एस.टी.बससेवा मात्र सुरळीत होती. सकाळच्या सत्रात प्रवाशांचाही ...

जनता कर्फ्यूतही वाहतूक सेवा मात्र सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रविवारी नंदुरबारसह चार शहरात जनता कर्फ्यू असतांनाही एस.टी.बससेवा मात्र सुरळीत होती. सकाळच्या सत्रात प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद दिसून आला. स्थानिक फेऱ्यांना कात्री दिली गेली. परंतु लांब पल्ल्याच्या फेºया कायम होत्या.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दर रविवारी नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर शहरात जनता कर्फ्यू लागू केला जातो. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. गेल्या आठवड्यात अनलॉक प्रक्रियेअंतर्गत बाजारपेठेची वेळ सायंकाळी चार ऐवजी सात करण्यात आली. त्यामुळे रविवारचा जनता कर्फ्यूत देखील सूट दिली जाण्याची शक्यता होती. परंतु तसे झाले नाही. रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. परंतु सार्वजनिक वाहतूक सेवा मात्र नियमित सुरू होती.
नंदुरबार आगारातून वेळापत्रका प्रमाणे सोडण्यात येणाºया ७० टक्के बसेस त्या त्या मार्गावर धावल्या. त्यांना प्रवाशांचा प्रतिसाद देखील चांगला होता. दुपारनंतर मात्र प्रवासी संख्या रोडावल्याने ३० टक्के फेºया रद्द करण्यात आल्या. त्यात बहुतांश फेºया या स्थानिक होत्या.
एस.टी.बस प्रमाणेच खाजगी प्रवासी वाहनांची वाहतूक देखील नियमित होती. त्यांनाही सकाळच्या सत्रातच बºयापैकी प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर खाजगी प्रवासी वाहतूक बंद दिसून आली. शहराअंतर्गत रिक्षा सेवा देखील दुपारपर्यंत बºयापैकी होती. पोलिसांनी देखील वाहतूक सेवेबाबत कारवाई करण्याचे टाळल्याचे चित्र होते.