घराला आग, संसारोपयोगी वस्तू जळून खाक

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: April 29, 2023 08:05 PM2023-04-29T20:05:32+5:302023-04-29T20:05:52+5:30

जवळचा चारा असल्याने चाऱ्याने पेट घेतला. लागलीच कुडाच्या घरालाही आगीने लपेटले.

House fire, household goods burnt in nandurbar | घराला आग, संसारोपयोगी वस्तू जळून खाक

घराला आग, संसारोपयोगी वस्तू जळून खाक

googlenewsNext

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोडलगाव देव आवलीपाडा येथे विजेच्या तारांचे शार्टसर्किट होऊन केबलने पेट घेतल्यामुळे कौलारू घराला आग लागली. यात घर जळून खाक झाले. यात घरातील संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे जळून गेल्याची घटना घडली. कुटुंब उघड्यावर आले आहे.

मोडलगाव (देव आवलीपाडा) येथील वीरसिंग शिवाजी वळवी यांच्या राहत्या कौलारू घराला दुपारी केबलने पेट घेतला. जवळचा चारा असल्याने चाऱ्याने पेट घेतला. लागलीच कुडाच्या घरालाही आगीने लपेटले. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला, परंतु पाणी घेण्यासाठीचे अंतर दूर असल्यामुळे आग विझविण्यात अपयश आले. परिणामी, काही वेळातच संपूर्ण घर जळून राख झाले. सुदैवाने घरातील सर्वजण लागलीच बाहेर निघाल्याने ते बचावले.

आगीत धान्य साठ्यासह जीवनावश्यक वस्तू जळून राख झाल्याने मोठे नुकसान झाले. पंचनामा करून शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली आहे. घटनास्थळी सरपंच भगतसिंग पटले व समाजिक कार्यकर्ते पिसा तडवी यांनी धाव घेत मदतकार्य केले.

Web Title: House fire, household goods burnt in nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग