हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू होणार पण अटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:09 IST2020-07-08T12:09:06+5:302020-07-08T12:09:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉजेस व गेस्ट हॉऊस सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र ...

हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू होणार पण अटीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉजेस व गेस्ट हॉऊस सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिली आहे़ आठ जुलै पासून एकूण क्षमतेच्या ३३ टक्के प्रमाणात दिलेल्या अटींवर ही प्रतिष्ठाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे़
लॉजेस व हॉटेल्स सुरू होत असताना जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल बंद राहतील़ जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात घेतलेले हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस आदी मात्र जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. बुधवारपासून सुरू होणाऱ्या हॉटेल्स, लॉजेस आणि गेस्ट हाऊससाठी विविध दिशा निर्देश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत़ यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांवर फलक, आॅडिओ व व्हिडिओ क्लीप लावणे तसेच सूचनांची माहिती देणारे फलक लावण्याचे सूचित करण्यात आले आहे़ हॉटेल व बाह्य जागेत व पार्किंगच्या ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन, सोशल डिस्टन्सिंग, प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग, रिसेप्शन टेबल व जागेत संरक्षक काचेची व्यवस्था, येणाऱ्यांसाठी हँड सॅनेटायझर आदीची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले आहे़
याठिकाणी काम करणाºया कामगार, कर्मचाºयांसाठी तसेच येणाºया ग्राहकांसाठी संरक्षक साधनांसह फेस कव्हर, हँड ग्लोव्हज, मास्क यांचा पुरवठा करण्याचे आदेश असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आॅनलाईन पेमेंट, सोशल डिस्टसिंगसाठी लिफ्टचा वापर करणे, सूचनेनुसार एसी व व्हेन्टीलेशन वापरण्याचे आदेशात म्हटले आहे़
लक्षण विरहीत ग्राहकांना परवानगी देण्यात यावी. फेस कव्हर किंवा मास्क असलेल्यांना प्रवेश द्यावा़ हॉटेलमध्ये संपूर्ण वेळ मास्क परिधान करणे तसेच हॉटेलमध्ये येणाºयांना आरोग्य सेतू अॅप बंधनकारक करण्यात आले आहे़ दरम्यान हॉटेल्समधील रेस्टॉरंट केवळ निवासींनाच उपलब्ध करण्यात यावे, गेमींग आर्केड, मुले खेळण्याचे क्षेत्र, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्यात येणार आहे़ मोठी संमेलने तसेच जमावाला प्रतिबंध राहील. हॉटेल्समधील मिटींग हॉलचा वापर करताना जास्तीत जास्त १५ व्यक्तीना परवानगी देण्यात आली आहे़ जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे़ पावसाळा हा येथील पर्यटनाचा हंगाम आहे़ या निर्णयामुळे येथे येणाºया पर्यटकांना आधार मिळणार आहे़
शासनाने परवानगी दिली असली तरी लोकांच्या मनात अद्याप भिती असल्याने हॉटेल सुरू केल्यानंतरही त्याला ग्राहकांच्या कितपत प्रतिसाद मिळेल ही शंकाच आहे़ याउलट हॉटेल चालकांच्या रोजचा खर्च वाढणारच आहे़ गेल्या चार महिन्यात व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे़ त्यामुळे शासनाने हॉटेल चालकांना मदत देण्याची आवश्यकता आहे़ नियमित परवाना, जीएसटी, वीज बिल व इतर सवलती मिळाव्यात़
-डॉ़ रविंद्र चौधरी, अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा हॉटेल असोसिएशन