अश्व स्पर्धांनी वेधले अश्वशौकीनांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:10 IST2019-12-20T12:10:11+5:302019-12-20T12:10:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व स्पर्धांना गुरुवारी प्रारंभ झाला. गुरुवारी ...

Horse racing attracts the attention of horsemen | अश्व स्पर्धांनी वेधले अश्वशौकीनांचे लक्ष

अश्व स्पर्धांनी वेधले अश्वशौकीनांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्तप्रभूंच्या यात्रेनिमित्त येथे सुरू असलेल्या चेतक फेस्टीवलमध्ये अश्व स्पर्धांना गुरुवारी प्रारंभ झाला. गुरुवारी अदंत मादी-नर, दोन दात मादी-नर स्पर्धा झाली. २५ डिसेंबरपर्यंत विविध अश्व स्पर्धा होणार आहेत.
चेतक फेस्टीवल समितीमार्फत आयोजित विविध कार्यक्रम व स्पर्धांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. बुधवारी रात्री लहान मुलांसाठी आयोजित कार्यक्रमाने धमाल केली. महिला-पुरुषांसह बालगोपालांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात कलाकारांनी मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या पबजी खेळामुळे विद्यार्थ्यांची होणारी दुर्दशा व दुष्परिणामावर आधारित नाटक सादर केले. या नाटकाचे सादरीकरण रमेश वारंग, आकाश भागवत, ललीत धारुनकर, संजय गवार, शौर्य यादव, कृतिका सोहोनी, पवन लवाड, करण पवार, शितल शिंदे व क्षितिया कदम यांनी केले. नाटकातील बालकलाकारांनी अक्षरश: धमाल उडवत प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकात विनोदाचीही मेजवानी होती.
गुरुवारपासून विविध अश्व स्पर्धांना प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी झालेल्या अदंत नर व दोन दात नर या गटात ३५ स्पर्धक घोडे सहभागी झाले. त्यात प्रथम क्रमांक इमरान शेख (नाशिक) यांचा ‘गुलजार’ घोडा, द्वितीय रामसिंग (मध्य प्रदेश) यांचा ‘शेरु’ तर तृतीय क्रमांक मोहंमद यामीन (उत्तर प्रदेश) यांच्या ‘शेरा’ घोड्याने पटकावला. ५१, ३१ व २१ हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. स्वतंत्र मोठा नर स्पर्धेतही ३५ घोडे मालकांनी सहभाग घेतला. त्यात हरदेवसिंग (राजस्थान) यांचा ‘शक्ती’ प्रथम, फैजल बिन महेफूज (हैद्राबाद) यांचा ‘राजू’ द्वितीय तर तळेगावचे रवींद्र निकम यांच्या ‘राजवीर’ घोड्याने तृतीय क्रमांक मिळविला. स्वतंत्र मादी गटात ४० घोडींचा समावेश होता. त्यात मोहंमद फारुख (मध्य प्रदेश) यांची ‘रश्क’ घोडी प्रथम, दिपूभाई (मध्य प्रदेश) यांची ‘रेशमा’ द्वितीय तर मध्य प्रदेशातील रुपेश पाटीदार यांच्या ‘सलोनी’ या घोडीने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या घोडी मालकांना अनुक्रमे ७१, ५१, ३१ रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिनह देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
सामूहिक दोन दंत मादी व अदंत मादी या स्पर्धेत ३५ घोडी मालकांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक महू (मध्य प्रदेश) येथील मोहंमद शाहरुख यांची ‘बर्क’, द्वितीय इंदूर येथील इर्शाद कुरेशी यांच्या ‘नुरी’ने तर तृतीय क्रमांक इंदूर येथील रुपेश पाटीदार यांच्या ‘सुंदरी’ घोडीने पटकावला. अनुक्रमे ५१, ३१ व २१ हजार रुपये रोख, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. परीक्षक म्हणून सुखविंदर सिंदू (पंजाब), अजित मंदार (रोहतक, हरियाणा), विकास बोयनकर (महाराष्टÑ), डॉ.विजय काशीद (दिल्ली) यांनी काम पाहिले. घोडा व घोडींचे वय, उंची, जात, लक्षणे, आरोग्य तपासणी, रंग, देखणा, रुबाबदार ही लक्षणे पाहून परीक्षणातून विजेते घोडे व घोडींची निवड करण्यात आल्याचे परीक्षकांनी सांगितले. या वेळी चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, प्रणवराज रावल, रणवीर रावल, जयेश पेकळे, मनू शर्मा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश कोयंडे यांनी केले. स्पर्धेचे नियोजन महेंद्र गिरासे, एकनाथ गिरासे, विवेक वाडिले, विनोद तावडे, अजय पाटील, संदीप जमादार यांनी केले होते. शुक्रवारी ‘काठेयावाडी’ अदंत मादी व नर, मोठा नर व मादी आदी अश्व स्पर्धा होणार आहेत.

४सारंगखेडा यात्रेत भरलेल्या घोडेबाजारात गुरुवारी ४७ घोड्यांची विक्री झाली. त्यातून २३ लाख सहा हजार रुपयांची उलाढाल झाली. आजअखेर ६३८ घोड्यांची विक्री होऊन दोन कोटी ४७ लाख १० हजार ९०० रुपयांची उलाढाल झाली आहे.
४अश्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशातील विविध भागातून घोडे दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी घोडे मालक घोड्यांकडून सराव करून घेत आहेत. घोड्यांचा सराव पाहण्यासाठीही यात्रेकरुंची मोठी गर्दी होत आहे. रात्रीही घोडे मालक आपल्या घोड्यांकडून सराव करुन घेत आहेत. हा सराव पाहण्यासाठीही घोडे मैदानावर अश्वशौकीनांची गर्दी होत आहे.

Web Title: Horse racing attracts the attention of horsemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.