Horse-lovers crowded in the Sarangkheeda horses market | सारंगखेड्याच्या घोडे बाजारात अश्वप्रेमींची गर्दी
सारंगखेड्याच्या घोडे बाजारात अश्वप्रेमींची गर्दी


लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : सारंगखेडा, ता.शहादा येथील ऐतिहासीक वारसा लाभलेल्या एकमुखी दत्त यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. भारतभर प्रसिद्ध असलेल्या घोडे बाजारात गर्दी केली व अबालवृद्ध व महिलांनी येथील घोडे बाजार पाहण्याचा आनंद लुटला.
सध्या घोडे बाजारात उलाढालीला सुरूवात झाली असून, दुसºया दिवशी दोन हजार घोड्यांच्या आवकमधून ११३ घोड्यांची विक्री झाली असून, या विक्रीतून ३० लाख ८३ हजार ६०० रुपयांची उलाढाल झाली आहे. एकूण आजअखेर १९९ घोड्यांच्या विक्रीतून ६४ लाख ८५ हजार २०० रुपयांची उलाढाल झाली आहे. अर्थात दोनच दिवसात ५० लाखापेक्षा अधिक उलढाल या घोडे बाजारात झाली. गेल्या वर्षीच्या घोडे बाजाराच्या उलाढालीचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यात्रोत्सवात घोडे बाजारामुळे अनेकांना रोजगाराची संधी महिनाभर मिळत असते. यात लहान मोठ्या व्यवसायाबरोबर मजूर वर्गालाही जास्तीत जास्त रोजगार या घोडे बाजारात उपलब्ध होतो. येथील बाजारात चारा विक्री व्यवसायातून महिलांना ५०० ते ६०० रूपये रोजगार रोजचा असा महिनाभर त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळतो. यातून जास्तीचा रोगजार मिळतो. यात टेंभा, सारंगखेडा, टाकरखेडा, वडदे, चवळदे, पुसनद, अनरद, कुºहावद येथील महिला मजूर वर्गाला रोजगाराची संधी प्राप्त होते.
चेतक महोत्सवाचे खास आकर्षण म्हणून ओळखल्या जाणाºया वातानुकूलीत डिजिटल मोबाईल थेटरचे उद्घाटन सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्यासह पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे व चेतक फेस्टिवल समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन
सारंखेडा यात्रोत्सवाला सुरूवात झाली असून, ही यात्रा शेतकऱ्यांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या यात्रेत दरवर्षी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यात आधुनिक यंत्रसामग्री तसेच नर्सरी, नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित अवजारे, त्याचबरोबर कीटकनाशक, बियाणे, टिशू कल्चरची रोपे, ठिबक सिंचनचे स्टॉल व शेततळे प्रात्यक्षिकदेखील या महोत्सवात दाखविण्यात येत असते. शुक्रवारी सकाळी १० वाजता चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, उपविभागीय कृषी अधिकारी विभा जोशी, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी आदींच्या उपस्थितीत राहणार आहे.

ऐतिहासीक वारसा लाभलेल्या घोडे बाजारात घोडे बाजाराला लागणाºया विविध साहित्यांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. यात घोड्यांना लागणारे खोडीर, शाल, झुंगरू, पट्टे, मोरखा तसेच लग्न समारंभात घोडे सजविण्यासाठी साज, छत्री, बग्गी असे साहित्य येथील बाजारात विक्रीसाठी येतात. याला मोठी मागणी असते. यात्रेत प्रथमच श्रीरामपूर येथील मज्जीदभाई यांनी दोन सीटरपासून ते सात सीटरची बग्गी विक्रीसाठी आणली आहे. हे बग्गी घोडे बाजाराचे आकर्षण ठरत आहे. २० हजार रूपयांपासून ते ४० हजारापर्यंत या बग्गीला मागणीही आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून पारंपरिक लग्न समारंभात वरातीसाठी बग्गी व्यवसाय करता करता बग्गी उत्पादनात मज्जीदभार्इंनी लक्ष वळविले व पाहता पाहता बग्गीवाले म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अगदी ग्रामीण भागापासून ते मुंबई येथील चित्रपट सृष्टीतदेखील त्यांनी विविध प्रकारच्या बग्ग्या बनवून दिल्या आहेत. ते १२ प्रकारच्या बग्ग्या बनवितात. एक घोड्याची बग्गी ते पाच ते सहा घोड्यांची बग्गी ते बनवितात. अगदी राजेशाही असीही सवारी पाहण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अनेकांची पावले या बग्गीपर्यंत वळतांना दिसून येत आहेत. लाकूड, स्टील, लोखंड व बेटींग टायर असा वस्तूंपासून ही बग्गी तयार केली आहे.

घोडे बाजाराबरोबर चेतक फेस्टीवल विविध स्पर्धांचे आयोजन करत असते. घोड्यांच्या विविध स्पर्धादेखील होत असतात. या स्पर्धेतून नवचैतन्य निर्माण होत असते. या स्पर्धा पाहण्यासाठी अश्वप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी देतात. या स्पर्धा ज्या ट्रॅकवर होणार आहेत त्या ट्रॅकवर दररोज टँकरने पाणी मारून तो ट्रॅक स्पर्धेसाठी तयार करतानाचे चित्र घोडे बाजारात दिसून येते. यावर जयपाल रावल स्वत: लक्ष केंद्रीत करून ट्रॅक तयार करून घेत आहेत.

Web Title: Horse-lovers crowded in the Sarangkheeda horses market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.