सेवानिवृत्त क्रीडा संचालकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:34+5:302021-07-30T04:32:34+5:30

शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव विद्यापीठाचे विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा शहादा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. ...

Honoring Retired Sports Director | सेवानिवृत्त क्रीडा संचालकांचा सन्मान

सेवानिवृत्त क्रीडा संचालकांचा सन्मान

शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव विद्यापीठाचे विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा शहादा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. बी. एस. पाटील, प्राचार्य डॉ. ए. जी.जयस्वाल, प्राचार्य डॉ. टी. ए. मोरे उपस्थित होते.

नवापूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विजय पाटील व नंदुरबार येथील जिजामाता महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. ईश्वर धामणे हे सेवानिवृत्त झाले. सेवापूर्ती सत्कार समारंभात डॉ. विजय पाटील व प्रा. डॉ. गौरी विजय पाटील तसेच डॉ. ईश्वर धामणे व कल्पना ईश्वर धामणे यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांनी दोन्ही क्रीडा संचालकांनी जळगाव विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय कार्य करून विद्यापीठाला क्रीडा क्षेत्रात दिशादर्शक मार्गदर्शन केल्याचे सांगितले. डॉ. दिनेश पाटील, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. ए. जी. जयस्वाल, डॉ. टी. ए. मोरे, डॉ. अरविंद कांबळे, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. भारत चाळसे, डॉ. भालचंद्र मोरे, डॉ. कैलास बोरसे, प्रा. एम. वाय. चव्हाण, प्रा. संजय भावसार, डॉ. राजधर बेडसे, डॉ. नितीन पाटील, प्रा. मनोज परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजय पाटील व डॉ. ईश्वर धामणे यांनीही ऋण व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आयोजन समितीचे डॉ. राजेश सोनवणे, प्रा. प्रशांत माळी, प्रा. आर. बी. सिसोदे, प्रा. अशोक भदाणे, प्रा. दीपक सूर्यवंशी, डॉ. देवेंद्र धाकड, डॉ. जगदीश तोरवणे, डॉ. राहुल ठाकूर, डॉ. तारक दास, डॉ. प्रियंका सुलाखे, डॉ. हासीन खान, प्रा. विनिश चंद्रन, प्रा. प्रसाद भोगे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Honoring Retired Sports Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.