मंदाणे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:35 IST2021-09-14T04:35:50+5:302021-09-14T04:35:50+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमराव साळुंखे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील होत्या. माजी ...

Honoring dignitaries from various fields at Mandane | मंदाणे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

मंदाणे येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भीमराव साळुंखे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील होत्या. माजी सरपंच विजय सनेर, माजी उपसरपंच अनिल भामरे, सुधाकर पवार, बाजार समितीचे संचालक किशोर मोरे, वास्तव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय साळुंखे, शिवाजी शैक्षणिक संस्थेचे सचिव प्रशांत मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. या मंडळाचे तरुण संचालक जिग्नेश बेहेरे व बबलू वडार यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांचे स्मरण रहावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोरोना काळात कार्य करणारे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे क्रीडा शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक व गावातील विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुनंदा पाटील, किशोर मोरे, अनिल भामरे, एम. एन. भामरे, आर. आर. सोनवणे, माजी सैनिक आदींनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दयानंद मराठे व मंडळाचे सचिव संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष मुकेश पाटोळे, संचालक किशोर वाघ, विलास पवार, नितीन पवार, बबलू अहिरे, खेळाडू व तरुणांनी सहकार्य केले.

Web Title: Honoring dignitaries from various fields at Mandane