शहादा अमरधाममधील सेवेकऱ्याचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:36 IST2021-09-24T04:36:14+5:302021-09-24T04:36:14+5:30

कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगराईत अनेकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आरोग्य सेवेकरी प्रताप ठाकूर यांनी जिवाची पर्वा न करता ...

Honor of Sevakarya in Shahada Amardham | शहादा अमरधाममधील सेवेकऱ्याचा सन्मान

शहादा अमरधाममधील सेवेकऱ्याचा सन्मान

कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगराईत अनेकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आरोग्य सेवेकरी प्रताप ठाकूर यांनी जिवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रामाणिक सेवा केली. प्रेताला उचलून ठेवण्यापासून तर अग्निसंस्कार विधी पूर्ण होईपावेतो सेवा देण्याचे काम केले. मार्च २०२० पासून आजपावेतो सुमारे ५६३ कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या पार्थिवावर अमरधाम येथे त्यांनी अग्निसंस्कार केले.

प्रताप ठाकूर हे गेल्या २५ वर्षांपासून अमरधाम येथे सेवेकरी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या प्रामाणिक सेवेबद्दल सातत्याने कौतुक होत असते. ठाकूर यांच्या उल्लेखनीय व प्रामाणिक सेवेची नोंद घेऊन शहादा जायन्टस् ग्रुपचे अध्यक्ष प्रा. भूषण बाविस्कर, प्रा. आर. टी. पाटील, माणक पाटील, डॉ. लक्ष्मण सोनार, माधव पाटील, प्रमोद सोनार, संजय सोनार, के.के. सोनार यांनी अमरधाम येथे जाऊन सामाजिक कृतज्ञेच्या भावनेतून ठाकूर यांना सन्मानित केले.

Web Title: Honor of Sevakarya in Shahada Amardham