रजाळेच्या मनोज मराठे यांचा संगमनेर येथे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:25+5:302021-08-18T04:36:25+5:30
रजाळे, ता. नंदुरबार येथील मूळ रहिवासी असलेले मनोज देवीदास मराठे हे पुणे येथे यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. ...

रजाळेच्या मनोज मराठे यांचा संगमनेर येथे गौरव
रजाळे, ता. नंदुरबार येथील मूळ रहिवासी असलेले मनोज देवीदास मराठे हे पुणे येथे यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार दिला आहे. कोरोना काळात अनेक कंपन्यांनी हजारो कामगारांना बेरोजगार केले. मात्र, मनोज मराठे यांनी अनेक हातांना रोजगार दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. संगमनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते मराठे यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भविष्यात आपली जन्मभूमी असलेल्या नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे उद्योग उभारून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह देवीदास मराठे, निर्मला मराठे, योगिता मराठे, सुभाष वाळे, नलिनी वाळे, भानुदास चव्हाण, संदीप मोरे, ईश्वर बोऱ्हाडे आदींची उपस्थिती होती. मनोज मराठे हे रजाळे येथील रहिवासी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवीदास लक्ष्मण मराठे यांचे पुत्र आहेत.