बडगुजर महिला मंडळातर्फे कन्यारत्न प्राप्त महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:13 IST2020-01-20T15:13:21+5:302020-01-20T15:13:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील बडगुजर समाज महिला मंडळातर्फे समाजातील कन्यारत्न प्राप्त माता व कन्यांचा सत्कार करण्यात आला. ...

बडगुजर महिला मंडळातर्फे कन्यारत्न प्राप्त महिलांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील बडगुजर समाज महिला मंडळातर्फे समाजातील कन्यारत्न प्राप्त माता व कन्यांचा सत्कार करण्यात आला.
जेथे नारीची पूजा होते तिथेच देवता वास करतात, रमतात असे सुभाषितात मोठ्या तोंडाने म्हटले जाते. परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये या सुभाषिताशी विसंगत वर्तन केले जाते. नारीची पूजा करण्याऐवजी तिची खेटराने पूजा करण्यात मोठा पुरूषार्थ मानला जातो. मुलगा जन्माला आला म्हणजे पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आल्यास कडूनिंबाची पाने खाल्यागत चेहरा वाकडा केला जातो. अशावेळी संस्कृत सुभाषितात सांगितलेली शिकवण कोठे जाते असा प्रश्न पडतो. या सर्व गोष्टीला फाटा देत नंदुरबार बडगुजर समाज महिला मंडळाच्या सदस्यांनी आपल्या समाजातील कन्यारत्न झालेल्या मातांचा सत्कार करुन मुलीच्या जन्माचे स्वागत केले.
हा उपक्रम बडगुजर समाज महिला मंडळ वेळोवेळी राबवित असते. अशावेळी मातांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. शहरातील कन्यारत्न झालेल्या मातांचा सत्कार प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा सुनिता मनोज बडगुजर, उपाध्यक्षा पौर्णिमा अनिल बडगुजर, सचिव रेणुका शरद बडगुजर, खजिनदार प्रिती गिरीष बडगुजर, आरती संदीप बडगुजर, स्वाती मिलिंद बडगुजर, वैशाली कैलास बडगुजर, अनिता भटू बडगुजर आदी उपस्थित होते.