घरोघरी गौरींचे उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:05 IST2019-09-06T13:05:02+5:302019-09-06T13:05:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात गणपतीपाठोपाठ मोठय़ा उत्साहात गुरुवारी गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाल़े शनिवारी गौरींचे विसजर्न होणार आह़े  ...

Homecoming Gauri arrives enthusiastically | घरोघरी गौरींचे उत्साहात आगमन

घरोघरी गौरींचे उत्साहात आगमन

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात गणपतीपाठोपाठ मोठय़ा उत्साहात गुरुवारी गौरींचे (महालक्ष्मी) आगमन झाल़े शनिवारी गौरींचे विसजर्न होणार आह़े 
सोमवारी मोठय़ा धुमधडाक्यात शहादा तालुक्यात गणरायाचे आगमन झाले होत़े गणरायाच्या पाठोपाठ गुरुवारी तेवढय़ाच धूमधडाक्यात व उत्साहात गौरींचे आगमन झाल्याने घरा-घरात आनंदाचे वातावरण पसरले आह़े महालक्ष्मींचा उत्सव तीन दिवसांचा असतो़ पहिल्या दिवशी विधिवत स्थापना करण्यात येत़े तत्पूर्वी महालक्ष्मीची संपूर्ण घरातून मिरवणूक काढण्यात येत़े दुस:या दिवशी 16 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो़ सत्यनारायण पूजेचे आयोजन करुन आप्तेष्टांना  दर्शन व तीर्थप्रसादाला आमंत्रित केले जात़े तिस:या दिवशी निरोप दिला जातो़ 
 

Web Title: Homecoming Gauri arrives enthusiastically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.