कोरोना काळात भरलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:47+5:302021-06-27T04:20:47+5:30
नंदुरबार : कोेरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने जिल्ह्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर करार तत्त्वावर भरती केली. ...

कोरोना काळात भरलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
नंदुरबार : कोेरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर, शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने जिल्ह्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची मानधन तत्त्वावर करार तत्त्वावर भरती केली. सद्याच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, शासनाच्या आदेशानुसार भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. सर्वांना मानधन देण्यात आले आहे.
कोरोनाचा काळ सुरू झाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामांचा अतिरिक्त ताण पडण्यास सुरुवात झाली होती, त्यांचा ताण कमी करण्यासाठी तातडीने तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता.
शासन नक्कीच मानधन देणार...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर शासनाच्या आदेशान्वये तातडीने तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. चतुर्थश्रेणी कर्मचारीसह स्टाफ नर्स, डॉक्टर्स, टेक्निशियन यासह इतर पदे भरण्यात आली होती. भरती करतानाच त्यांना तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासन आदेशान्वये त्यातील काही कर्मचारी कमी करण्यात आले आहेत.
-डॉ. के.डी.सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.