डिसेंबरअखेर घरकुल पूर्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:47 IST2019-12-19T11:47:14+5:302019-12-19T11:47:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केली आहेत. परंतु हप्तेपद्धतीने अनुदान बहुतांश उपलब्ध करुन दिले ...

Home delivery orders by end of December | डिसेंबरअखेर घरकुल पूर्तीचे आदेश

डिसेंबरअखेर घरकुल पूर्तीचे आदेश


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर केली आहेत. परंतु हप्तेपद्धतीने अनुदान बहुतांश उपलब्ध करुन दिले असतानाही काही लाभार्थ्यांकडून घराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली असून शेतीच्या कामांमुळे या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल आवास योजना राविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला देण्याचे शासनामार्फत जाहिर करण्यात आले आहेत. त्यात सहाही तालुक्यांना आवश्यकतेनुसार दरवर्षी उद्दिष्ट देण्यात येते आहे. त्यात २०१६ पासून २०२० या चार वर्षाच्या कालावधीत या योजनेसाठी एकुण ९५ हजार ३९२ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासानामार्फत ७९ हजार १८६ लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात सर्वाधिक अक्कलकुवा तालुक्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे.
उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांची निवडही करण्यात आली. त्यापैकी बहुतांश लाभार्थ्यांना हप्ता पद्धतीने घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदानही उपलब्ध करुन देण्यात आले आहे. परंतु काही लाभार्थ्यांकडून अद्याप घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाला आढळून आले आहे. त्यामुळे घरकुल उद्दिष्ट पूर्ण करण्यात नंदुरबार जिल्हा मागे पडऱ्याची शक्यता आहे. उद्दिष्ट पूर्ततेत आघाडी घेण्यासाठी वेळोवेळी बांधकामे पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही बहुतांश घरकुले अपुर्ण असल्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत अपुर्ण बांधकाम असलेल्या लाभार्थ्यांना दि. ३१ डिसेंबरपर्यंत तातडीने घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे लाभार्थ्यांकडून बांधकामाला निश्चितच गती दिली जाईल. शिवाय लाभार्थ्यांना अपेक्षेनुसार हक्काचे घरही उपलब्ध होईल. त्यामुळे केलेले आवाहन लाभार्थ्यांसाठी हिताचेच असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या आवाहनामुळे लाभार्थ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
शेती कामांच्या ऐन धावपळीत प्रशासनाने लाभार्थ्यांना पत्र दिल्याने काही लाभार्थ्यांकडून कामाला गती देण्यात आली असले तरी डिसेंबर अखेरपर्यंत कुठल्याही लाभार्थ्यांकडून बाधकाम पूर्ण होणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने पत्राद्वारे केलेल्या आवाहनाबाबत संवेदनशिलतेने विचार करावा, अशी अपेक्षा लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

दुर्गम भागातील या योजनेच्या बहुतांश लाभार्थ्यांनी रब्बी हंगामातील शेतीकडे वळले आहे. त्यामुळे ते त्या कामातच अधिक व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतीमुळे ठिकिंठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य घेऊन जाण्यासाठी रस्त्याची सोयच नसल्यामुळे कामात अडथळा येत असल्याचे लाभार्थ्यांकडून म्हटले जात आहे.

४घराचे बांधकाम अपूर्ण असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना पत्र देण्यात आले आहे. त्यात डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करºयाचे आवाहन केले आहे. परंतु या कालावधीत काम पूर्ण न झाल्यास जिल्हा परिषद प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील पत्रात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे यामुळे लाभार्थ्यांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली असून रब्बी हंगाम संपेपर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
४काही लाभार्थ्यांकडून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून हे काम पूर्ण करण्याचे आवाहन केल्यास लाभार्थ्यांना बांधकामासाठी योग्य वेळ देता येईल, असे लाभार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु लाभार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वेळ दिल्यास लाभार्थी अधिक दिरंगाई करतील, अशी भूमिकाही प्रशासनाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Home delivery orders by end of December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.