सिमेंटच्या जंगलामुळे होळीला मोळी भेटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:55+5:302021-03-19T04:28:55+5:30

पूर्वी होळीच्या दिवशी सकाळपासूनच गोवऱ्या आणि वाळलेली लाकडे गोळा करण्याची लगबग असायची. यासाठी घरातील एका सदस्याला जावे लागायचे. आधी ...

Holi is not celebrated due to cement forest | सिमेंटच्या जंगलामुळे होळीला मोळी भेटेना

सिमेंटच्या जंगलामुळे होळीला मोळी भेटेना

पूर्वी होळीच्या दिवशी सकाळपासूनच गोवऱ्या आणि वाळलेली लाकडे गोळा करण्याची लगबग असायची. यासाठी घरातील एका सदस्याला जावे लागायचे. आधी घरातील लहान मुले प्रत्येक घरी जाऊन चार-चार गोवऱ्या होळीला द्या, अशा घोषणा देऊन प्रत्येक घरातून गोवऱ्या जमा करायचे. तसेच प्रत्येक घरातील लहान मुले शेण गोळा करून धाब्यावर होळीसाठी शेणापासून विशेष प्रकारचे साहित्य बनवायचे. परंतु गेल्या काही वर्षांपासून यात बदल झालेला दिसून येत आहे.

शहरी भागातही लाकडे आणि गोवऱ्या विकत आणून होळी पेटवली जायची. पण दिवसेंदिवस होत असलेल्या बदलांमुळे लाकडे आणि शेणाच्या गोवऱ्या पूर्वीप्रमाणे होळी पेटवण्यासाठी दिसत नाहीत. शिवाय या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे होळी सणावर शासनाने निर्बंध लादल्यामुळे नियमांचे पालन करून साधेपणाने ग्रामीण तसेच शहरी भागातही होळी साजरी केली जाणार आहे. शिवाय लाकडे आणि गोवऱ्या यांच्या कमतरतेमुळे दर वर्षापेक्षा खूप मोठ्या उंचीची होळी न करता लहान होळी प्रत्येक गावोगावी दिसणार आहे. कारण वाईट आचार-विचारांना तिलांजली देण्यासाठी आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे.

Web Title: Holi is not celebrated due to cement forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.