हजारो भाविकांच्या साक्षीने पेटली देवाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 14:08 IST2020-03-09T14:08:20+5:302020-03-09T14:08:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डाब राजमंडलातील देव-देवतांची होळी साजरी करण्यासाठी याहा मोगी माता यात्रेनंतर डाब ता. अक्कलकुवा येथील ...

The Holi of God burned with the testimony of thousands of devotees | हजारो भाविकांच्या साक्षीने पेटली देवाची होळी

हजारो भाविकांच्या साक्षीने पेटली देवाची होळी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डाब राजमंडलातील देव-देवतांची होळी साजरी करण्यासाठी याहा मोगी माता यात्रेनंतर डाब ता. अक्कलकुवा येथील मोरी राहीच्या टेकडीवर नंदुरबार जिल्ह्यासह गुजरातमधील आदिवासी बांधव जमले. या बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत रात्रभर नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर देवतांची होळी विधीवत पेटविण्यात आली.
होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजार व काही ठिकाणी प्रत्यक्ष होळीलाच सुरुवात झाली असली तरी डाब राजमंडलातील देव-देवतांची होळी असल्याने मोरी राहीच्या होळीला विशेष मान व महत्व असते. त्यामुळे या होळीसाठी केवळ नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे गुजरातमधूनही आदिवासी बांधव डाब येथे जमले. या सर्व बांधवांच्या उपस्थितीत रात्रभर ढोल वादन स्पर्धा घेण्यात आली. त्याशिवाय नाच-गाणे व विशेष पथकाकडून होळी नृत्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. ढोल स्पर्धेत ६० ढोल सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने बिजरीगव्हाण, साकलीउमर, कुंडल, सरी, वालंबा, सोलाकाट, हुणाखांब, वेहगी, बर्डी, भगदरी, वरखेडी, वेली, जामली येथील ढोल दिसून आले.
ढोल स्पर्धेत सहभागी होण्याआधी प्रत्येक ढोलवादक व मालकांकडून आपापल्या ढोलचा दोर व सुरेल आवाजासाठी त्यावर चढवलेले कातड्याची संपूर्ण खातरजमा करण्यात आली. या स्पर्धेत रात्री ३ वाजेच्या सुमारास वालंबा, ता.अक्कलकुवा येथील वाड्या पाडवी व साकलीउमर येथील विरसिंग पाडवी यांचा ढोल सर्वाधिक सुरेल आवाजात वाजत होता. तर चार वाजेपासून या दोन्ही ढोलसह बिजरीगव्हाण, वरखेडी येथील राज्या वळवी, जामली येथील मोज्या तडवी, सरी येथील बिज्या वसावे, बिजरीगव्हाण येथील अशोक तडवी व कुंडल येथील रतिलाल पाडवी याचे ढोलही गरम झाल्याने सुरेल आवाजात वाजू लागले. सहभागी सर्व ढोलमालक व वादकांना डाब येथील गावपंचायतीमार्फत वाहतुक खर्चासह अपेक्षित मदत करण्यात आली.

४डाब राजमंडलातील देवतांची होळी ही परंपरेनुसार मोरी राही या डोंगरावर पेटवली जाते. तेथे जागेचा अभाव असल्यामुळे मुख्य कार्यक्रम डाबच्या मध्यवर्ती भागात घेतला जातो. सोयीच्या ठिकाणी रात्रभर कार्यक्रम घेतला जात असला होळी पहाटे पेटविण्यात येणार असल्याने पेटवण्यापूर्वी होळी पूजेसाठी मोरी राही या टेकडीवरच भाविकांना जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात केवळ चंद्राच्या उजेडाचा आधार घेत हजारो भाविक या डोंगराकडे जात होते. हा डोंगर तीव्र उतार शिवाय उंचसखोल दरीतील पायवाटेने होळीपर्यंत जावे लागते. रात्रीचा अंधार शिवाय दरी असतानाही तेथे जाणाºया भाविकांना कुठलीही अडचण आली नाही. डोंगरावर जाणाºया भाविकांमध्ये केवळ तरुणच नव्हे तर वृद्धांचाही सहभाग अधिक होता. त्यामुळे होलीदेवतेची कृपा असल्याचे डोंगरावर पूजेसाठी जाणाºया भाविकांकडून सांगण्यात आले.

४अक्कलकुवा पंचायत समितीचे माजी सभापती बिज्या वसावे यांनीही मोरी राही येथील होळीसाठी ढोल आणला. एवढेच नव्हे तर त्यांचा ढोल स्पर्धेत आघाडीवर राहिलेल्या ढोलपैकी एक होता. तर धडगाव त्यालुक्यतील वरखेडी सरपंच राज्या वळवी व कुंडल येथील माजी उपसरपंच दिवाल्या पाडवी यांनीही ढोल आणले, हे ढोलही आघाडीवरच राहिले.

Web Title: The Holi of God burned with the testimony of thousands of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.