न्यू हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 12:50 IST2020-03-14T12:49:50+5:302020-03-14T12:50:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नतळोदा येथिल गो.हु. महाजन न्यू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घनकचऱ्याची होळी केली. शिवाय धुलीवंदनही नैसर्गिक रंग ...

न्यू हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : नतळोदा येथिल गो.हु. महाजन न्यू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घनकचऱ्याची होळी केली. शिवाय धुलीवंदनही नैसर्गिक रंग तयार करीत साजरी करण्यात आले.
होळी व धुलीवंदन या सणांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सण साजरा करतांना रसायनयुक्त रंगाचा वाप व होळीसाठी लाकूड जाळण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ºहास होतो. ही बाब टाळण्यासाठी तळोदा येथील गो.हु.महाजन न्यू हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली. धुलीवंदनही नैसर्गिक रंगानेच साजरी करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ही संकल्पना स्काऊट गाईड शिक्षक संकेत माळी यांची असून त्यांच्या मार्गदर्शनानुसारच होळी साजरी झाली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील कचरा गोळा करून त्या कचºयाची होळी केली. विद्यार्थ्यांनी पळसाची फुले, गुलाब पुष्प, जास्वंदाचे फुल, हळद, गेरू, यापासून रंग तयार केला त्यानंतर नैसर्गिक रंग एकमेकांना लावून धुलीवंदन देखिल साजरा केले. यावेळी मुख्याध्यापक ए.एच. टवाळे यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.
या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापिका एस.एन. रामीकर, पर्यवेक्षक एस.एम. महिरे, आर.सी. सांस्कृतिक विभागप्रमुख ए.ए.महाजन, इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका शितल महाजन, एन.जी.माळी, यू.एच.केदार, पी.व्ही. मगरे, डि.पी.महाले, आशा पाडवी, वाय.पी. पवार, एन.आर. सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.