शहादा येथे चिनी वस्तूंची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:44 IST2020-06-23T11:44:07+5:302020-06-23T11:44:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाºया चिनी सैनिकांना रोखताना व सीमेचे संरक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या २० ...

शहादा येथे चिनी वस्तूंची होळी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाºया चिनी सैनिकांना रोखताना व सीमेचे संरक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या २० भारतीय जवानांना शहरात श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजता पूर्ण शहरातील नागरिकांनी दोन मिनीटे स्तब्ध होऊन श्रद्धांजली अर्पण केली.
शहरातील राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे चीन सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता सायरन वाजल्यानंतर शहरातील सर्व नागरिकांनी आहे त्या ठिकाणी दोन मिनीटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता पालिकेचा सायरन वाजल्याबरोबर संपूर्ण शहरातील नागरिकांनी आहे त्या स्थितीत व जागेवरच श्रद्धांजली अर्पण केली. बाजारात, मुख्य रस्त्यांवर पायी चालणाºया नागरिकांनी व वाहनधारकांनी आपापली वाहने जागीच उभी करून अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकासमोरील चौकात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर चौकात चीनचे राष्टÑाध्यक्षाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी चीनच्या विरोधात घोषणा देऊन ‘भारत माता की जय’चा जयघोष केला. आमदार राजेश पाडवी यांनी चिनी मालावर बहिष्कारसंदर्भात कार्यकर्त्यांना प्रतिज्ञा दिली. या वेळी आमदार राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील, शहादा राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ.वसंत अशोक पाटील, माजी नगरसेवक विनोद शंकर सोनार, शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील, मराठा महासंघाचे शाम जाधव, डॉ.कांतीलाल टाटीया, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेश जैन, भाजपा शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल, पंकज सोनार, रवींद्र जमादार, ज्ञानेश्वर चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, संजय कासोदेकर, तालुका अध्यक्ष विजय मराठे, डॉ.हेमंत सोनार, मीनानाथ सोनार, गौरव जोशी, गणेश धाकड, भटू शिंपी, रुपेश सोनार, बबलू परदेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.