डीबीटी रद्द करण्यासाठी धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:41 IST2020-02-06T12:41:30+5:302020-02-06T12:41:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सेंट्रल किचन व डीबीटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करत भारतीय ट्रायबल पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

डीबीटी रद्द करण्यासाठी धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सेंट्रल किचन व डीबीटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी करत भारतीय ट्रायबल पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे़ बुधवारी हे आंदोलन सुरु करण्यात आले़
धरणे आंदोलन सुरु करण्यापूर्वी ट्रायबल पार्टीच्यावतीने पालकमंत्री अॅड़ के़सी़पाडवी यांना निवेदन दिले होते़ निवेदनात मध्यवर्ती स्वयंपाकगृह अर्थात सेंट्रल किचन सिस्टिम बंद करुन रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करुन घ्यावे, वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी डीबीटी ही योजना बंद करुन पूर्वी प्रमाणेच खाणावळ पद्धत सुरु करावी, डीबीटी रद्द करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता़ त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी, नामांकित इंग्रजी शाळेची प्रवेश प्रक्रिया, शाळा निवड करणे, शाळा बदलून मिळणे आदी सर्व अधिकार प्रकल्प स्तरावरील अधिकाऱ्यांना बहाल करण्यात यावेत, अटल रुग्ण वाहिनी ११८ चा वापर फक्त आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी करावा, रुग्णवाहिकेला डॉ़ जयपालसिंह मुंडा यांचे नाव देण्यात यावे, प्रकल्पांतर्गत मुलामुलींसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सुरु करण्यात यावे, नंदुरबार व तळोदा प्रकल्पांतर्गत शासकीय आदिवासी मुला-मुलींचे निवासी आश्रमशाळांची बांधकामे मजूर असताना ती अपूर्ण आहेत़ ही बांधकाम त्वरीत सुरु करण्यात यावीत, स्वतंत्र रोहित्र बसवण्यात यावे, जात पडताळणी विभागाच्या अधिकाºयांी बोगस आदिवासींना दाखले दिले तर त्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ निवेदनावर जिल्हाध्यक्ष के़टीग़ावीत यांच्या पदाधिकाºयांच्या सह्या आहेत़