वाघोदा येथे घराच्या उतारा न दिल्याने मारहाण

By Admin | Updated: June 7, 2017 13:19 IST2017-06-07T13:19:04+5:302017-06-07T13:19:04+5:30

ग्रामपंचायत कर्मचारीसह चारजण जखमी

Hitting out at the house at Waghoda, | वाघोदा येथे घराच्या उतारा न दिल्याने मारहाण

वाघोदा येथे घराच्या उतारा न दिल्याने मारहाण

>ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.7- घराचा उतारा दिला नाही याचा राग येवून जमावाने ग्रामपंचायत शिपायास बेदम मारहाण केली. त्याला सोडविण्यासाठी आलेल्यांनाही जमावाने मारहाण केल्याने चारजण जखमी झाल्याची घटना वाघोदा, ता.नंदुरबार येथे 6 जून रोजी सकाळी घडली.
वाघोदा येथील संजय मोतीलाल पाडवी यांच्यासह इतरांनी नारायण हरदास यांच्या घराचा उताराची मागणी ग्रामपंचायतीकडे केली. ग्रामपंचायत शिपाई संजय नाईक यांनी घरमालकाला घेवून या तरच उतारा मिळेल असे सांगितले. त्याचा राग येवून संजय पाडवी व इतरांनी नाईक यास मारहण केली. त्यास सोडविण्यासाठी गेलेले संजय कोच:या नाईक, कोच:या उकडय़ा नाईक, आशाबाई संजय नाईक सर्व रा.वाघोदा यांना जमावाने लाकडी काठी, लोखंडी सळई, पाईप व विटांनी बेदम मारहाण केली. त्यात चारहीजण गंभीर जखमी झाले. 

Web Title: Hitting out at the house at Waghoda,