चुलीवरील खिचडीची अनोखी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:43 IST2020-03-08T21:43:02+5:302020-03-08T21:43:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरू असलेल्या व काही वर्गांच्या लवकरच सुरू होणाऱ्या परीक्षांच्या व अभ्यासाच्या ताणतणावातून विद्यार्थीनींना दूर ...

Hitchhiker | चुलीवरील खिचडीची अनोखी स्पर्धा

चुलीवरील खिचडीची अनोखी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुरू असलेल्या व काही वर्गांच्या लवकरच सुरू होणाऱ्या परीक्षांच्या व अभ्यासाच्या ताणतणावातून विद्यार्थीनींना दूर करण्यासाठी ‘चुलीवरील खिचडी’ ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. नंदुरबारातील मुलींचे अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी वसतिगृहात ही स्पर्धा रंगली.
समाजकल्याण विभागाद्वारे संचलित अनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, नंदुरबार येथे आगळावेगळा गाव वसला होता. अधिक्षिका सुषमा मोरे यांच्या संकल्पनेतून वनभोजनाप्रमाणे ग्रामीण पद्धतीच्या भोजनाचा आस्वाद देणारी ' चुलीवरील खिचडी' ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली.
शाळेतील १३ रूम या विद्यार्थिनींच्या निवासोपयोगी आहेत. त्या प्रत्येक रूमच्या विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रांगणात आपापल्या रूमच्या मुलींसाठी चुलीवर खिचडी व इतरही अनेक खाद्यपदार्थ बनविले. प्रत्येक रूमला शाळेच्या प्रांगणात जागा व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
गृहसजावट, वस्तूमांडणी, स्वच्छता, रांगोळी, खिचडीची चव, प्लेट डेकोरेशन, तोंडी लावण्याचा पदार्थ यावरून गुणांकन करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कल्पना चावला गृह निकिता बागुल व ग्रुप, द्वितीय क्रमांक डॉ. आंनदीबाई जोशी गृह नयना अहिरे व ग्रुप, तृतीय क्रमांक- बहिणाबाई चौधरी गृह महेश्वरी बागुल व ग्रुप यांनी पटकावला.
परिक्षक म्हणून नामदेव शिंदे, ज्योती शिंदे व शीतल ठाकूर हे होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वत: ग्रामीण पद्धतीने स्वयंपाक बनविण्याचा आनंद तर घेतलाच तसेच विविध पद्धतीने गृहसजावट व प्लेट डेकोरेशनही केले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण होते.

Web Title: Hitchhiker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.