शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

ऐतिहासिक अक्राणी महाल शासकीय अनास्थेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:13 PM

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील धडगाव शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरचा अक्काराणीचा महाल शासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. गेल्या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील धडगाव शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरचा अक्काराणीचा महाल शासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षात ५०० वर्षांपेक्षा अधिकचा वैभवशाली इतिहास सांगणारा हा किल्ला दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. यातून इतिहासाच्या पाऊलखुणा मिटत असतानाही कोणत्याही विभागाकडे त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे. महाराणा प्रताप यांच्या भगिनी अक्काराणी यांच्या वास्तव्याचे दाखले देण्यात येणा-या अक्राणी महालाची निर्मिती १७ शतकात काठीचे संस्थानिक  राणा गुमानसिंग यांनी हा किल्ला बांधला असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. तसेच राजस्थानातील १७ व्या शतकात आश्रयास आलेल्या राजपूत योद्ध्यांनी हा किल्ला बांधला असल्याचा दावा ब्रिटीश इतिहासकारांनी केला आहे. अनेकविध दावे आणि प्रतीदावे असले तरीही राजस्थानी बनावट असलेला हा किल्ला बांधकांचा अजोड असा नमुना आहे. सातपुड्याच्या डोंगरांमध्ये संपूर्ण वीटांनी केलेले बांधकाम लक्षवेधी आणि प्रगत अशा विचारांचे आहे. तीन दिशेला भिंती आणि भक्कम अशा तटबंदी यातून शत्रूची बांधाबंदिस्ती करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून येते. पुरातन बारव आणि दगडात कोरलेले एक मंदीरही येथे आहे. 

१६३४ मध्ये शहाजहानने अक्राणी महाल हे संस्थान म्हणून घोषित केल्याची नोंद धुळे गॅझेटमध्ये आहे.  महाराणा प्रतापांची बहिण अक्काराणी यांचे येथे वास्तव्य राहिल्याचे दाखले दिले जातात. यामुळे या परिसराला अक्राणी असे नाव पडले.  या परिसरात इतिहासाच्या खाणाखुणा नाणी इतर स्वरूपात सापडत आहेत.   येथील राणी काजल माता अनेक राजस्थान व महाराष्ट्रातील राजपूत समाजबांधवांची कुलदैवत असल्याचे सांगण्यात येते.  

संपूर्ण विटांचे बांधकाम असलेल्या या महालाच्या भिंती दिवसेंदिवस अधिक जीर्ण होत आहेत. किल्ल्याचे संवर्धन न झाल्यास लवकरच या भिंती नष्ट होणार आहेत. पर्यटक म्हणून येणारे सोबतचा कचराही येथेच टाकत असल्याने वास्तू खराब होत आहे. प्रशासनाने लक्ष दिल्यास हा ऐतिहासिक ठेवा जपला जाणार आहे. सातपुड्याच्या डोंगराळ भागात असलेल्या अक्राणी महालाचा पुरातत्त्व विभागाला विसर पडला आहे. येथे आजवर कोणत्याच अधिका-याने भेट दिलेली नसल्याची माहिती समाेर आली आहे. 

या किल्ल्याचे पुरातत्त्व विभागाने जतन करणे आवश्यक आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक येथे लावण्याची गरज आहे. किल्ल्यात समाधी आहेत त्यांचे संवर्धन होण्याची गरज आहे.   प्रविण पावरा, गडप्रेमी, रोषमाळ बुद्रुक ता. धडगाव