जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे दु:ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:38 IST2020-09-06T12:38:21+5:302020-09-06T12:38:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मागील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे ...

जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे दु:ख
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मागील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे दु:ख आणि वेदना मी जाणून आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून येतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज येथे केले.
राष्ट्रवादी युवक कांग्रेसची आढावा बैठक तालुक्यातील चौपाळे येथील मंदिरावर घेण्यात आली. त्यावेळी शेख बोलत होते. यावेळी माजी आमदार शरद गावित, प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत सिसोदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे, राजेंद्र पाटील, एम एस गावित, अमृत लोहार, विठ्ठल पटेल, राकेश जाधव, रविंद्र सोनवणे, गोलू राजपूत, सिताराम पावरा उपस्थित होते. यावेळी शेख म्हणाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन मदत कार्य केले. गेल्या काळात भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना सत्तेविना राहावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल त्यामुळे युवकांनी कामाला लागावे असेही त्यांनी सांगितले.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे काम उल्लेखनीय असे आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य कवच मिळावे यासाठी सामाजिक जाणिवेचे भान ठेवीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्यातर्फे पत्रकारांचा आरोग्य विमा काढण्यात आला. मेहबूब शेख यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मागील निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात एकही जागा विधानसभेची लढवू शकलो नाही त्याचे दु:ख आणि वेदना मी जाणून आहे. मात्र येणाºया निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार निवडून येतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज येथे केले.