लक्ष्मी बॅाम्ब चित्रपटावर हिंदू जनजागृतीचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 12:25 IST2020-11-08T12:24:17+5:302020-11-08T12:25:22+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : श्रीलक्ष्मी देवीचा अपमान करणार्‍या आणि 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणार्‍या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर ...

Hindu Awareness Objection to Lakshmi Bomb Film | लक्ष्मी बॅाम्ब चित्रपटावर हिंदू जनजागृतीचा आक्षेप

लक्ष्मी बॅाम्ब चित्रपटावर हिंदू जनजागृतीचा आक्षेप

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : श्रीलक्ष्मी देवीचा अपमान करणार्‍या आणि 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन देणार्‍या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांना देण्यात आले. 
निवेदनात म्हटले आहे की, दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार याचा 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर त्याचे नाव हेतूतः 'लक्ष्मी बॉम्ब' असे ठेवले आहे. त्यामुळे पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला आहे. यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या देवीची विटंबना केली आहे. 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन दिले आहे. एकीकडे इतर धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावतात, म्हणून अन्य काही चित्रपटांची दखल घेऊन लगेच बंदीची शिफारस केली जाते. त्याच धर्तीवर हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटावरही सरकारने बंदीची शिफारस करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार एक भूताने पछाडलेल्याची भूमिका साकारत आहे. त्याच्यातील भूत तृतीय पंथीय असल्याचे भासते. तसेच मोठे लाल कुंकू, लाल साडी, केस मोकळे सोडणे, हातात त्रिशूळ घेऊन नाचणे, हे जणू देवीचेच रुप असल्याचे भासवण्याचा केलेला प्रयत्न हा निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना हिंदु जनजागृती  समितीचे राहुल मराठे, सौरभ पंडित, विजय मराठे आदी उपस्थित होते. 
एकजण जखमी
n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सिंधी कॅालनी भागात मोकाट गुरांची झुंड अचानक पळू लागल्याने त्यात एकजण जखमी झाल्याची घटना घडली. या भागात नेहमीच मोकाट गुरांचा त्रास असतो. याबाबत पालिकेकडे या भागातील नागरिकांनी तक्रारी करूनही लक्ष दिले जात नसल्याचे म्हणने आहे. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: Hindu Awareness Objection to Lakshmi Bomb Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.