महामार्ग विभाग म्हणतंय, महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भरणार खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST2021-09-07T04:37:04+5:302021-09-07T04:37:04+5:30

याबाबत संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता विकास महाले यांना संपर्क केला असता, रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही. खड्डे भरण्याच्या कामासाठी ...

The Highways Department says the pits will be filled within a month after the tender process is completed | महामार्ग विभाग म्हणतंय, महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भरणार खड्डे

महामार्ग विभाग म्हणतंय, महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भरणार खड्डे

याबाबत संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता विकास महाले यांना संपर्क केला असता, रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही. खड्डे भरण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया करून ठेकेदाराची नियुक्ती केल्यानंतरच कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बायपास रस्त्याचेही भिजत घोंगडे

वाहतुकीच्या दृष्टीचे सोयीच्या शेवाळी ते नेत्रंग महामार्गावरून गेल्या काही काळात वाहतूक वाढली आहे. महामार्ग निर्मितीवेळी नंदुरबार आणि तळोदा शहराबाहेरून काही किलोमीटर लांबीचे वळण रस्ते निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या महामार्ग निर्मितीच्या डीपीआर रिपोर्टमध्ये नंदुरबार आणि तळोदा या दोन शहरांबाहेरून काढण्यात येणाऱ्या वळण रस्त्यांचा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही शहरांतील चिंचोळ्या रस्त्यावरूनच धावणार किंवा कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Web Title: The Highways Department says the pits will be filled within a month after the tender process is completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.