महामार्गावर बस अडवून चालकाला दगड मारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:00 IST2019-06-06T12:00:42+5:302019-06-06T12:00:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रस्त्यावर चालत्या एस.टी.बसच्या समोर दुचाकी आडवी लावून बस चालकाला दगड मारून जखमी केल्याची घटना ...

On the highway the bus stopped and hit the stone on the driver | महामार्गावर बस अडवून चालकाला दगड मारला

महामार्गावर बस अडवून चालकाला दगड मारला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रस्त्यावर चालत्या एस.टी.बसच्या समोर दुचाकी आडवी लावून बस चालकाला दगड मारून जखमी केल्याची घटना नागपूर-सुरत महामार्गावर गंगापूर गावानजीक घडली. याप्रकरणी लहान कडवान, ता.नवापूर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
जगदीश ईश्वर गावीत, रा.लहान कडवान, ता.नवापूर असे संशयीताचे नाव आहे. अमळनेर आगाराची बस नागपूर-सुरत महामार्गाने नवापूरकडे जात असतांना जगदीश गावीत या दुचाकी चालकाने बस महामार्गावर गंगापूर गावाजवळ अडवली. बसपुढे दुचाकी आडवी लावून त्याने चालक रवींद्र रामभाऊ बोरसे यांना दगड मारून फेकला. त्यात त्यांच्या हनुवटीला मार लागला. चालकाशी वाद घालत, शिविगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला. 
याबाबत रवींद्र बोरसे यांनी विसरवाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जगदीश ईश्वर गावीत याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: On the highway the bus stopped and hit the stone on the driver