राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:02 IST2019-04-29T23:01:37+5:302019-04-29T23:02:18+5:30

उत्स्फूर्त प्रतिसाद : भाजप-काँग्रेसमध्ये होती लढत

The highest turnout in the state is in Nandurbar constituency | राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात

राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार मतदारसंघात


नंदुरबार : मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदान झाले. राज्यात सर्वाधिक मतदान करणारा नंदुरबार मतदारसंघ ठरला. अंतिम वेळेपर्यंत जवळपास ६८ ते ७० टक्केपर्यंत मतदानाची आकडेवारी जाण्याची शक्यता आहे.
नंदुरबार मतदारसंघात मुख्य लढत ही भाजप उमेदवार व खासदार डॉ.हिना गावीत व काँग्रेसचे उमेदवार व आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्यात होती. मतदारसंघात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. सुरुवातीपासूनच मतदानात उत्साह होता. त्यामुळे पहिल्या दोन तासापासून मतदारसंघातील आकडेवारी राज्यात सर्वाधिक होती. त्यामुळे अंतिम आकडेवारी देखील राज्यात सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे. साधारणत: ६८ ते ७० टक्केपर्यंत मतदान होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली.
दरम्यान, काही किरकोळ वाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदान यंत्र बिघाडाच्या घटना देखील किरकोळ स्वरूपाच्या होत्या.

Web Title: The highest turnout in the state is in Nandurbar constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.