शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

वेतन लाभ वसुलीला उच्च न्यायालयाची स्थगिती, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

नंदुरबार : सुधारित आश्वासित प्रगती योजनेमुळे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वी दिलेले वेतनाचे लाभ वसूल करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली ...

नंदुरबार : सुधारित आश्वासित प्रगती योजनेमुळे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्वी दिलेले वेतनाचे लाभ वसूल करण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१० अंतर्गत १५ फेब्रुवारी २०११ नुसार सुधारित आश्वासित प्रगती योजनेमुळे मिळालेले लाभ राज्य शासनाने ७ डिसेंबर २०१८ व १६ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आले आहेत. तब्बल आठ वर्षानंतर शासनाने सदर शासन निर्णयाने लाभ रद्द केले असल्यामुळे कबचौ उमवि विद्यापीठस्तरीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य जी.वाय पाटील व ऋषिकेश सुभाष चित्तम आणि इतर २१५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वरील अन्यायकारक शासन निर्णय रद्द व्हावेत म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर शासन निर्णयामुळे डिसेंबर २०१८ पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नती लाभ घेतले आहेत, अशा कर्मचाऱ्यांकडून वसुलीचे आदेश दिले आहेत. यामुळे गेल्या अडीच वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रस्ताव स्वीकारले जात नाही. त्यामुळे निवृत्तीवेतन मिळत नाही तसेच सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ अद्याप मिळालेला नाही म्हणून ऋषिकेश चित्तम व जी.वाय पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी ॲड. नरसिंह जाधव यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.

न्या.एस. व्ही.गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असता न्यायालयाने शासनाला व संबंधितांना नोटीस काढली आहे व याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या वसुलीस तूर्तास स्थगितीचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. नरसिंह जाधव व ॲड. राकेश सी. ब्राम्हणकर यांनी काम पाहिल्याची माहिती सिनेट सदस्य तथा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जी.वाय.पाटील यांनी दिली.