हि. गो. श्रॅाफ हायस्कूल येथे भूगोल कार्यशाळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST2021-01-21T04:29:26+5:302021-01-21T04:29:26+5:30
भूगोल कार्यशाळेत उत्तरायण, दक्षिणायण,चंद्रकला, आंतरराष्ट्रीय वाररेषा, सूर्यग्रहण,चंद्रग्रहण,ऋतूनिर्मिती यासारख्या अनेक संकल्पना स्पष्ट करणारे मॅाडेल तयार करण्यात आले. भूगाोल कार्यशाळेत ...

हि. गो. श्रॅाफ हायस्कूल येथे भूगोल कार्यशाळा संपन्न
भूगोल कार्यशाळेत उत्तरायण, दक्षिणायण,चंद्रकला, आंतरराष्ट्रीय वाररेषा, सूर्यग्रहण,चंद्रग्रहण,ऋतूनिर्मिती यासारख्या अनेक संकल्पना स्पष्ट करणारे मॅाडेल तयार करण्यात आले. भूगाोल कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ६० संकल्पना स्पष्ट करणारे १५ मॅाडेल बनविण्यात आले असून ज्ञानरचनावादी साहित्य शिकवताना शिक्षकांना व विद्यार्थ्यांना संकल्पनांचे दृढीकरण होेते, असे प्राचार्य सुषमा शाह यांनी समारोपप्रंसगी सांगितले. अंजली मराठे यांनी कार्यशाळेविषयी अनुभवकथन केला.
या कार्यशाळेत साधनव्यक्ती म्हणून चेतना पाटील यांनी काम पाहीले तर भूगोल शिक्षक कैलास वळवी, शीला पाटील,पल्लवी चव्हाण, अंजली मराठे, भारती माळी, प्रतिभा साळुंखे, गिरीष चव्हाण, मनोज पवार, जितेंद्र बारी या शिक्षकांनी कार्यशाळेत सहभागी होऊन काम पाहिले. सूत्रसंचालन देवीदास पाटील तर हेमंत लोहार यांनी आभार मानले.