शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

असली येथे पारंपरिक बारमेघ जत्रेतून वर्तवले पावसाचे भाकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 1:03 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : केरळात मान्सूनचे आगमन अद्याप झालेले नसले तरी येणारा पाऊस हा शेतक:यांना निराश करणारा नाही, ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : केरळात मान्सूनचे आगमन अद्याप झालेले नसले तरी येणारा पाऊस हा शेतक:यांना निराश करणारा नाही, असे भाकित तालुक्यातील असली येथील ‘बारमेघ जांतरे’मध्ये केले गेल़े पारंपरिक अशा या बारमेघ यात्रेत खरीपाच्या तयारीसह पावसाचा अंदाज घेतला जातो़   सातपुडय़ात पारंपरिक शेतीमूल्य जपणारे आदिवासी बांधव वर्षानुवर्षे चालत असलेल्या पद्धतीनुसार शेती करून उत्पन्न मिळवण्यास प्राधान्य देतात़ परंपरेने चालत आलेल्या शेतीचा :हास होऊ नये यासाठी धडगाव तालुक्याच्या दुर्गम भागात जून महिन्याच्या पहिल्या दिवशी खरीप हंगामाला साहाय्यकारी ठरणारी ‘बारमेग जातरें’ अर्थात बारमाही यात्रा भरवण्यात येत़े या यात्रेत पावसाचा अंदाज बांधून मग पेरणी करावयाची बियाणे आणि साधनांचा वापर यावर चर्चा करण्यात येत़े काही कारणास्तव 10 वर्षे खंड पडलेली ही यात्रा गेल्यावर्षापासून माजी आमदार अॅड़ क़ेसी़पाडवी यांच्या प्रयत्नांनी हा पारंपरिक उत्सव पुनरुज्‍जिवत झाला़ यंदाही असली येथे झालेल्या या यात्रेत शेकडोंच्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होत़े यावेळी विविध कार्यक्रम होऊन शेतीविषयक माहिती देण्यात आली़  मागच्या पिढीकडून येणा:या पिढीला पारंपरिक शेती पद्धत समजावून सांगण्यासाठी होत असलेल्या या यात्रोत्सवात पारंपरिक बी-बियाण्याची साठवण, पेरणी आणि संवर्धनाबाबत चर्चा करण्यात आली़ तसेच जल जंगल आणि जमीन याबाबत चर्चासत्र घेण्यात आल़े झाडाखाली स्थापन केलेल्या बारमेघचे पूजन करुन पावसाचा अंदाज काढण्यात आला़ पुजारांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडल़े यात्रोत्सवात आमदार क़ेसी़ पाडवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कागडा पाडवी यांनी शेतक:यांना मार्गदर्शन केल़े पारंपरिक शैलीत झालेल्या यात्रोत्सवात वर्षानुवर्षे पेरत असलेल्या बियाण्यांची प्रतवारी, नैसर्गिकदृष्टय़ा त्यांचे महत्त्व यासह वनभाज्यांच्या बियाण्यांची विक्री करण्यात आली होती़ यासोबतच विविध प्रकारच्या पारंपरिक साहित्य बनवून घेत त्याची खरेदी आदिवासी शेतक:यांनी केली़ दोन दिवसात याठिकाणी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील शेकडो शेतक:यांनी सहभाग नोंदवला होता़ असली येथे भरणा:या यात्रेत पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी एका झाडाला प्रारंभी पाण्याने तुडूंब भरलेली 12 मडकी बांधली जातात़ एका ओळीत बांधलेल्या या 12 मडक्यांना फोडण्यासाठी 12 गावातील प्रत्येकी एका मान्यवराची निवड करण्यात येत़े त्यांच्याकडून धनुष्यबाणाने ही मडकी फोडली जातात़ मडकं फुटल्यानंतर त्यातून जमिनीवर पडणा:या पाण्याचा वेग आणि आकारमानानुसार अंदाज घेत पावसाचे भाकित केले जात़े यंदा सर्व 12 मडक्यातून जमिनीवर एकाच वेळी मुबलक पाणी पडल्याने पाऊस समाधानकारक किंवा त्यापेक्षा अधिक येईल असा अंदाज वर्तवला गेला़ सर्व 12 मान्यवरांचा असली येथे माजी आमदार अॅड़ पाडवी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला़ यानंतर झाडाखाली असलेल्या बारमेघ देवाचे पूजन झाल़े  4शेतक:यांकडून खरेदी करण्यात येणारी अवजारे पारंपरिक पद्धतीने सागाच्या पानावर, खाटेवर तसेच घराच्या पडवीत ठेवली होती़ बैलांसाठीचा नाडा म्हणजे दोर, रार्ही- नागरांवरच्या बैलाला बांधलेला दोर, बैलाच्या नाकातील नाथ, मुरख्यी अर्थात बैलाच्या गळ्यातील घरी तयार केलेले सुती दोर, नांगरासाठी वापरले जाणारे जोंते म्हणजे दुशेर, जमीन नांगरणारे नागर, वख्खर आदी लाकडी साहित्याची विक्री झाली़  4या यात्रेत गावराणी बी-बियाण्याची खरेदी विक्री झाली़ यात मोर, भगर, बर्टी, भात, ज्वारी आणि मका या बियाण्याचा समावेश होता़ यातच दुर्गम भागातच उगवणा:या पावसाळी भाज्यांची बी-बियाणे विक्रीही करण्यात आली़ त्यात फळे आणि कडधान्याच्या बियाण्याचा समावेश होता़