पतीच्या जाचाने पत्नीने जाळून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:46 IST2019-05-27T12:46:02+5:302019-05-27T12:46:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घटस्फोट न देणे, सततचा त्रास याला कंटाळून 19 वर्षीय विवाहितीने जाळून घेत आत्महत्या केल्याची ...

Her husband got burnt to the test by consuming a wife | पतीच्या जाचाने पत्नीने जाळून घेतले

पतीच्या जाचाने पत्नीने जाळून घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घटस्फोट न देणे, सततचा त्रास याला कंटाळून 19 वर्षीय विवाहितीने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना पायरविहीर, ता.नवापूर येथे घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.  10 एप्रिल रोजी घटना घडून 25 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
कश्मिरा कल्पेश वसावे (19) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा पती कल्पेश दिनेश वसावे, रा.पायरविहिर, ता.नवापूर हा नेहमीच तिला त्रास देत होता. त्यामुळे कश्मिरा यांनी पतीकडे घटस्फोट देखील मागितला होता. घटस्फोट देणे दूरच त्रास अधीक वाढला. त्याला कंटाळून महिलेने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. 10 एप्रिल रोजी ही घटना घडली होती. उपचार घेतांना महिलेचा मृत्यू झाल्याने व तिच्या जबाबावरून फिर्याद नोदंविण्यात आली. कल्पेश वसावे यास नवापूर पोलिसांनी अटक केली आहे. डीवायएसपी रमेश पवार, पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार नागवे करीत आहे. 

Web Title: Her husband got burnt to the test by consuming a wife