जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक भागात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:45 IST2020-08-07T12:45:24+5:302020-08-07T12:45:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी अर्धा ते पाऊण तास दमदार पाऊस झाला. बुधवारी ...

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक भागात दमदार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी अर्धा ते पाऊण तास दमदार पाऊस झाला. बुधवारी देखील जिल्हाभरात पावसाने बºयापैकी हजेरी लावली होती. अनेक भागात पाणी साचले होते.
सायंकाळी साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाली. अर्धा ते पाऊण तास पाऊस सुरू होता. अनेक भागात पाणी साचले होते. सखल भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक भाग जलमय झाले होते.
जिल्ह्यात यंदा पावसाची तूट आहे. सलग आणि संततधार पाऊस यंदा आतापर्यंत झालाच नाही. त्यामुळे सरासरी इतका पाऊस अद्यापही झालेला नाही.
मात्र, पिकांच्या वाढीसाठी लागणारा पाऊस वेळेवर बरसत असल्यामुळे पिकांची स्थिती समाधानकारक आहे. परंतु नदी, नाले अद्यापही पुरेशा प्रमाणात प्रवाही झालेले नसल्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्याची स्थिती समाधानकार नाही. शिवाय जमिनीतील पाण्याची पातळी देखील वाढलेली नाही. त्यामुळे खरीप हंगाम तर बºयापैकी येईल परंतु रब्बीसाठी मोठी अडचण ठरणार आहे. अर्थात येत्या दीड ते दोन महिन्यात पावसाची स्थिती कशी राहील त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
सद्य स्थितीत जिल्ह्यात सरासरीचा ४० टक्के पाऊस झाला आहे. जून व जुलै महिन्याची सरासरी पावसाने गाठलेली नाही.