संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:45 IST2019-08-04T13:45:02+5:302019-08-04T13:45:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी :तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच कामे ...

संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी :तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा पुनर्वसन परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच कामे ठप्प झाली असल्याचे चित्र आहे.
परिसरात सध्या मयत तसेच उत्तरकार्य कार्यक्रमासाठी मात्र ग्रामस्थांना बाहेर गावाहून आलेल्या नातेवाईकांना बसण्या व उठण्यासाठी सोय लावणे कठीण जात असल्याचे दिसून येत होते. परंतु पाऊस उघडीप द्यायचे नाव घेत नसल्याने आणि सर्वसामन्यांना बाहेरून महागडा वॉटरप्रुफ मंडप आणणे शक्य होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी यावर मार्ग काढला आहे. या वेळी एकमेकांच्या सहकार्याने लाकडी दांडय़ा तसेच ताडपत्री गोळा करून मयत व उत्तरकार्याच्या ठिकाणी ग्रामस्थ स्वत: परिश्रम घेत लाकडी दांडय़ा खड्डे खोदून गाडतात व त्यावर ताडपत्री व्यवस्थितरित्या झाकून मंडप तयार करीत आहे. यामुळे बाहेर गावाहून येणा:या पाहुण्यांना बसण्याची सोय करण्यात येत असल्याने संबंधित व्यक्तीचा मंडपाचा खर्चही वाचत आहे. या ग्रामस्थांतर्फे राबविण्यात येणा:या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.