मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:23 IST2020-09-22T12:23:48+5:302020-09-22T12:23:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी दिली़ सुमारे पाऊणतास पाऊस सुरू होता़ यातून ...

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी दिली़ सुमारे पाऊणतास पाऊस सुरू होता़ यातून शहर आणि गावठाण फिडरवरील वीज पुरवठा दोन तासांपेक्षा अधिक काळ बंद पडला होता़
शनिवारी रात्री उशिरा शहरासह जिल्ह्यात वादळीवाºयासह पावसाने हजेरी लावली होती़ यातून जागोजागी झाडे कोसळून वीज तारा तुटल्या होत्या़ नागरिक आणि प्रशासन सकाळपासून झाडे तोडणे आणि तारा पूर्ववत करण्याच्या कामाला लागला होता़ सायंकाळी ही कामे पूर्ण होताच पाच वाजेपासून शहरात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी देत झोडपून काढले़ यामुळे बाजारपेठेत आलेल्यांची चांगलीच धावपळ उडाली़ पावसामुळे शहरातील सर्व गल्लीबोळात पाणी साचून होते़ उशिरापर्यंत पाण्याचे लोंढे वाहत असल्याने वाहनधारकांना वाहने काढण्यात अडचणी येत होत्या़
शहरासोबत जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे़ नंदुरबार तालुक्यात २८, शहादा १९ तर धडगाव तालुक्यात १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ पावसामुळे शेतशिवारातील कापूस, ज्वारी, बाजरी या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात येत आहे़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात पावसामुळे घरांची पडझड झाल्याची माहिती आहे़ अद्याप पंचनामे मात्र सुरू झालेले नाहीत़