दुसºया दिवशीही मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:38 IST2020-09-11T12:38:09+5:302020-09-11T12:38:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी देखील जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सुरू झालेल्या पावसाची ...

Heavy rain the next day | दुसºया दिवशीही मुसळधार पाऊस

दुसºया दिवशीही मुसळधार पाऊस


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशी अर्थात गुरुवारी देखील जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सुरू झालेल्या पावसाची रिपरिप उशीरापर्यंत सुरू होती. जिल्ह्यातील इतर भागात देखील तुरळक स्वरूपाचा पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात पुढील तीन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय तापीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे.
बुधवारी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यामुळे शिवण व पाताळगंगा नदीला पूर आला होता. त्या पुरात दोन जण अडकले होते, परंतु त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गुरुवारी देखील सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळी उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
अतिवृष्टीचा इशारा
हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तलाठी,मंडळ अधिकारी व तालुका स्तरीय अधिकारी यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुख्यालय सोडू नये. जिल्ह्यातील नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठालगतच्या नागरीकांनी सतर्क रहावे व योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील ७२ तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
तापीची पातळी वाढली
जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे धोकापूर्व पातळी २१३ मीटर असून आज रोजी पाणी पातळी २१३.८ मीटर एवढी असल्याने हतनूर धरणातुन अचानक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येऊ शकतो. तसेच हवामान खात्याकडून पुढील तीन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हतनूर आणि सुलवाडे बॅरेज धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.
पुढील ७२ तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

Web Title: Heavy rain the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.