जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटसह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:48 PM2020-03-27T12:48:39+5:302020-03-27T12:48:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात ुदुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पावसाचा जोर अधीक होता. नंदुरबार ...

 Heavy rain with hail in many parts of the district | जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटसह जोरदार पाऊस

जिल्ह्यातील अनेक भागात गारपीटसह जोरदार पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात ुदुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पावसाचा जोर अधीक होता. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील अनेक ठिकाणी तुरळक गारपीट देखील झाली. यामुळे मात्र गहू, कांदा, पपई, आंबा या पिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी सांयकाळी पावसाने हजेरी लावली. शहादा, नंदुरबार, नवापूर तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचार वाजेपासून हवा सुरू झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नंदुरबारसह परिसरात साधारणत: २० ते ३० मिनिटे पाऊस झाला. नंदुरबार तालुक्यातील लहान शहादा, शिंदे, खोंडामळी परिसरात तुरळक स्वरूपाची गारपीट झाली.
अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे रस्त्यांवरू पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके देखील साचले. शेतांमध्ये देखील पाणी साचले होते. घरांचे देखील या पावसामुळे नुकसान झाले.
पावसामुळे मात्र गहू, हरभरा, कांदा या पिकांसह पपई, आंबा पिकाचे देखील नुकसान झाले आहे.
शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नव्हता. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आधीच संचारबंदीमुळे नागरिक घरात बसून आहेत. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे समस्येत भर पडली आहे.
वीज कंपनीकडे कर्मचाऱ्यांची कमरता असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत झाली होती.

नंदुरबार शहरासह परिसरात गुरुवारी रात्री देखील पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे जनजीवनावर
तळोदा तालुक्यातील अनेक भागात देखील पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता.
आंबा,हरभरा, कांदा, गहू, पपई पिकांना फटका

Web Title:  Heavy rain with hail in many parts of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.