शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! नवापुरात तिघांची आत्महत्या, मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून पित्यानेही दिला रेल्वेखाली जीव

By भूषण.विजय.रामराजे | Updated: May 23, 2023 18:53 IST

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला.

- भूषण रामराजे नंदुरबार -  जिल्ह्यातील नवापूर शहरातील तीनटेंबा भागातील युवकाने पत्नीसह रेल्वेखाली उडी घेत, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. वडिलांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिल्याने त्याने हा निर्णय घेतला. तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मुलाने पत्नीसह आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर, पित्यानेही क्षणाचा विचार न करता, धावत्या रेल्वेत स्वत:ला झोकून दिल्याची ही घटना आहे. घटनेमुळे नवापूर परिसरासह नंदुरबार जिल्हा हादरला आहे.

सावन सय्यद गावित (२१), रोशनी सावन गावित (१९) आणि सय्यद कर्मा गावित (५०) अशी मयतांची नावे आहेत. शहरातील तीनटेंबा भागात रहिवासी असलेल्या रहिवासी सय्यद कर्मा गावित यांचा मुलगा सावन याने सोमवारी रात्री जेवण सुरू असताना नवीन मोटारसायकलीची मागणी केली होती. यावेळी सय्यद गावित यांनी मोटारसायकल घेण्यास नकार दिला होता. यातून घरात किरकोळ वाद झाला होता. हा वाद संपल्यावर सावन हा पत्नी रोशनी हिच्यासह घराबाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यावर फुलफळी भागातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली पत्नीसह उडी घेत, सावन याने जीवनयात्रा संपविली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती सय्यद गावित यांना कळल्यावर त्यांनी फुलफळी भागात धाव घेतली होती. दरम्यान, या ठिकाणी मुलगा आणि सुनेचा मृतदेह पाहून भावनाविवश होत, त्यांनीही धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. हा प्रकार सय्यद यांच्या पत्नी सुमित्रा यांना कळल्यावर, त्यांनी एकच हंबरडा फोडला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर, फुलफळी, तीनटेंबा, देवलफळीसह शहरातील नागरिकांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली होती.

माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी धाव घेतली होती. तिघांच्या मृतदेहाचे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सय्यद गावित हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांना चार मुली आणि सावन हा एकच मुलगा होता. फेब्रुवारी महिन्यात त्याचा विवाह देवलफळी भागातील रोशनी यांच्यासोबत झाला होता. संसार सुखाचा सुरू असताना, मुलाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. सकाळी तिघांवर सामूहिकरीत्या अंत्यविधी करण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवार