दिल, दोस्ती दुनियादारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:29+5:302021-06-24T04:21:29+5:30
गेल्या तीन महिन्यानंतर बाहेर गावाच्या पाहुण्यांचे आगतस्वागत आता होऊ लागले आहे. त्याला कारण कोरोनाचा कमी झालेला प्रार्दूभाव.तीन महिने कुणी ...

दिल, दोस्ती दुनियादारी...
गेल्या तीन महिन्यानंतर बाहेर गावाच्या पाहुण्यांचे आगतस्वागत आता होऊ लागले आहे. त्याला कारण कोरोनाचा कमी झालेला प्रार्दूभाव.तीन महिने कुणी कुणाच्या घरी गेले नाही, सुख-दुखातही लांबूनच सहभागी झाले. आता मात्र सर्वसामान्य व्यवहार झाल्याने दिल-दोस्ती-दुनियादारीची झलक ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. नंदुरबारातील एका मित्रांच्या गृपमधील काही सदस्य मुंबई येथे नोकरी करतात. महिन्याला एकदा ते नंदुरबारला एकत्र येतात. परंतु गेल्या तीन महिन्यापासून ते एकत्र येऊ शकले नव्हते. यातील काही मित्रांच्या घरात सुख-दुखाच्या घटना देखील घडल्या होत्या. परंतु नाईलाजाने एकमेकांपासून दूरच राहावे लागले होते. मुंबईच्या मित्रांना देखील कंपनीने बाहेरगावी जाण्यास मनाई केल्याने त्यांचाही नाईलाज होता. अखेर कोरोना ओसरल्यानंतर एकदाच्या सुट्या मिळाल्या आणि हा गृप तीन महिन्यानंतर एकत्र आला. तीन दिवसातील सहवासात मित्रांनी सुख-दुखाचे प्रसंग शेअर करून सहभागी झाले. दरवेळची धम्माल करण्यापेक्षा त्यांनी विधायक कामाला प्राधान्य देत एका संस्थेला आर्थिक मदत केली. कॉलनीत वृक्षारोपणासाठी लोखंडी संरक्षक जाळ्या उपलब्ध करून दिल्या. तिसऱ्या दिवशी सर्वांनी एकत्र येत कॉलनीत ज्यांच्याकडे कोरोना काळात दुखद घटना घडली होती त्यांच्याकडे जाऊन सांत्वन केले. दरवेळी मौजमस्ती करणाऱ्या या गृपचा हा वेगळा अनुभव कॉलनीवासीयांना सुखद अनुभव देऊन गेला, दिल-दोस्ती-दुनियादारीचीही मिसाल देऊन गेला....
-मनोज शेलार, नंदुरबार.