सासऱ्याकडून सुनेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 11:47 IST2020-01-10T11:46:55+5:302020-01-10T11:47:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सासूला शिविगाळ करू नका म्हणून सांगण्यास गेलेल्या सुनेला सासºयाने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना ...

Hearing from a father-in-law | सासऱ्याकडून सुनेला मारहाण

सासऱ्याकडून सुनेला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सासूला शिविगाळ करू नका म्हणून सांगण्यास गेलेल्या सुनेला सासºयाने काठीने बेदम मारहाण केल्याची घटना तालंबा, ता.अक्कलकुवा येथे घडली. अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
छगन जालमसिंग वळवी हे त्यांची पत्नी लिलाबाई यांना शिविगाळ करून मारहाण करीत होते. याबाबत सून मनिषा या समजविण्यास गेल्या असता त्याचा राग येवून सासरे छगन वळवी यांनी मनिषा यांना काठीने जबर मारहाण केली. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Hearing from a father-in-law