नंदुरबारात आरोग्य कर्मचा:यांचे पुन्हा कामबंद आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 12:59 IST2018-05-10T12:59:12+5:302018-05-10T12:59:12+5:30

नंदुरबारात आरोग्य कर्मचा:यांचे पुन्हा कामबंद आंदोलन सुरू
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 10 : आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन देवूनही कंत्राटी आरोग्य कर्मचा:यांबाबत शासन काहीही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा:यांनी 11 ते 24 एप्रिल दरम्यान कामबंद आंदोलन केले होते. कंत्राटी कर्मचा:यांना समकक्ष रिक्त पदांवर बिनशर्त समायोजन करावे, समायोजन होईर्पयत समान काम समान वेतन द्यावे. आशा कार्यकर्ती यांना मासिक मानधन निश्चित करून गटप्रवर्तकांना दुप्पट मानधन देण्याची मागणी होती. त्यावेळी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी संघटनेसोबत बैठक घेवून आश्वासने दिली होती. त्यात त्रिस्तरीय समितीबाबत निर्णय घेणे, समितीमध्ये राज्यसंघटनेच्या अध्यक्ष, सचिव यांचा निमंत्रीत सदस्य म्हणून सहभाग असणे, समितीची प्रथम सभा घेवून त्या सभेमध्ये एनएचएमअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांचे समायोजनाच्या दृष्टीने पदभरती थांबविण्याचा निर्णय घेणे तसेच सर्व निर्णयांचे तातडीने परिपत्रक काढण्याचा निर्णयांचा समावेश होता. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. कुठलाही निर्णय न झाल्याने आता पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसमोर धरणेही सुरू आहेत.