आरोग्य कर्मचारी महासंघाचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:50+5:302021-02-10T04:31:50+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या व वर्षानुवर्षापासून दुर्लक्षित असलेल्या विविध मंजूर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने ...

Health workers' federation postpones fast | आरोग्य कर्मचारी महासंघाचे उपोषण स्थगित

आरोग्य कर्मचारी महासंघाचे उपोषण स्थगित

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या व वर्षानुवर्षापासून दुर्लक्षित असलेल्या विविध मंजूर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने त्यांनी प्रशासनाला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी महासंघाला चर्चेला बोलवले. महासंघाचे नेते डॉ. कांतीलाल टाटिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेत आरोग्य सेवक यांना आरोग्य सहायकपदी, आरोग्य सेविका यांना आरोग्य सहायिकापदी आणि गेल्या वेळेस पदोन्नतीत डावललेल्या दोन्ही नर्सेस भगिनींना पदोन्नती देणे तसेच आरोग्य विभागातील सर्व संवर्गाला सन २००९ पासून कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्याच्या विषय अंतिम टप्प्यात असून यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे पदोन्नती समितीच्या मिटिंगच्या तारखेसाठी फाइल ठेवली असल्याने व यासंबंधीचे प्रस्ताव कागदपत्रे शिष्टमंडळाला अवगत करून दिल्याने जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याने बेमुदत उपोषण स्थगित केले आहे.

पदोन्नती समितीची तातडीने बैठक होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती व कालबद्ध पदोन्नतीचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी खासदार डॉ. हीना गावीत व आमदार डॉ. विजयकुमार गावीत हे प्रयत्न करणार आहेत. डीसीपीएस, एनपीएस व जीपीएफ हिशोब आरोग्य कर्मचाऱ्यांना लेखी स्वरूपात मिळावा यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याबरोबर स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची अंतिम टप्प्यापर्यंत कार्यवाही केल्याने डॉ. कांतीलाल टाटिया यांनी पुढील आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक होऊन हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला, अशी माहिती आरोग्य कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस राहुल माळकर, सतीश जाधव, नितीन पवार, विशाल मोघे यांनी पत्रकान्वये दिली.

Web Title: Health workers' federation postpones fast