आरोग्य कर्मचा:याचा म्हसावदला गळफास
By Admin | Updated: March 20, 2017 23:24 IST2017-03-20T23:24:52+5:302017-03-20T23:24:52+5:30
म्हसावद, ता. शहादा : येथील ग्रामीण रुग्णालयात शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेल्या सुदेश रत्नाकर पवार (48, रा़ शहादा) या कर्मचा:यांने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली़

आरोग्य कर्मचा:याचा म्हसावदला गळफास
म्हसावद, ता. शहादा : येथील ग्रामीण रुग्णालयात शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेल्या सुदेश रत्नाकर पवार (48, रा़ शहादा) या कर्मचा:यांने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली़ सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावद ग्रामीण रुग्णालयात वाहनचालक या पदावर सुदेश पवार कार्यरत होत़े सोमवारी दुपारी कर्मचारी निवासाच्या छताच्या हुकला दोर बांधून आत्महत्या केल्याचे दिसून आल़े त्यांनी कौटुंबिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज आह़े
याबाबत मयत पवार यांची बहिण सुचिता रत्नाकर पवार यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात माहिती दिली.