तोरखेड्यात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:12 IST2020-07-07T12:11:57+5:302020-07-07T12:12:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची ...

तोरखेड्यात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तोरखेडा : शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करुन उपाययोजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तोरखेडा येथील महिला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोना बाधीत आढळल्यानंतर गावात विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर या महिलेच्या अतिसंपर्कातील १३ जणांना दोन टप्प्यात शहादा येथील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. पैकी १ जुलै रोजी वृद्धाचे नंदुरबार येथे निधन झाले. मात्र अहवाल येणे बाकी असल्याने त्यांच्यावर कोवीड-१९ च्या नियमानुसार अंत्यसंस्कार पार पडले. ५ जून रोजी मयत वृद्धासह सहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. सोमवारी गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी, ग्रामविस्तार अधिकारी बी.एस. सूर्यवंशी, ग्रामसेवक चेतन पाटील, ग्रामपंचायत पदधिकारी, पं.स.चे माजी सदस्य प्रियदर्शन कदमबांडे व आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. गोसावी यांनी उपाययोजना व आरोग्याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी हिंगणी येथेही भेट दिली. गावात पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मोहने, डॉ.गोपाल भारुडे, डॉ.विजय पावरा, आरोग्य सहायक एस.एच. सावडे, आशा कार्यकर्ती सरला शिंदे, अंगणवाडी सेविका रत्ना चौधरी, पोलीस पाटील दयाराम चौधरी, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी शशिकांत सावळे, कोतवाल प्रवीण मोरे आदी गावात तळ ठोकून आहेत. तोरखेडा येथे पुन्हा पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.